यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सुपर 8चा पहिला सामना आज (19 जून) रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध युनायटेड स्टेट्स अमेरिका (RSA vs USA) यांच्यामध्ये खेळला जात आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स या स्टेडियमवर हा सामना रंगला आहे. दक्षिण आफ्रिकेन प्रथम फलंदाजी करताना 195 धावांचं आव्हान अमेरिकेसमोर ठेवलं आहे.
अमेरिकेनं टाॅस जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी पाचारण केलं होत. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं 4 गडी गमावून 194 धावा ठोकल्या. त्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकनं 40 चेंडूत सर्वाधिक 74 धावांची आक्रमक खेळी खेळली. यामध्ये त्यानं 7 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार ठोकले. कर्णधार एडन मार्करम 46, हेनरिक क्लासेन 36, ट्रिस्टन स्टब्स 20 धावा यांच्या जोरावर आफ्रिकेनं 194 धावांचा आकडा गाठला.
अमेरिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरनं आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. अमेरिकेचा अन्य कोणताही गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही. परंतु अमेरिका 195 धावांचा कशाप्रकारे पाठलाग करत हे पाहणंदेखील महत्त्वाच ठरेल.
दक्षिण आफ्रिका- क्विंटन डी कॉक(यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्करम(कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
अमेरिका- शायन जहांगीर, स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (यष्टीरक्षक), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, अली खान, सौरभ नेत्रावळकर
महत्त्वाच्या बातम्या-
सुपर 8 सामन्यापूर्वी ‘किंग’ कोहलीच्या कमबॅकवर आकाश चोप्रानं केली भविष्यवाणी
सुपर 8च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं हारला टाॅस; पाहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
टी20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेताच ट्रेंट बोल्टनं दिला चाहत्यांना भावनिक संदेश; पाहा व्हायरल पोस्ट