---Advertisement---

वर्ल्डकप ट्रॉफीचा अपमान केल्याची फळे भोगत आहे ऑस्ट्रेलिया! त्यानंतर चार आयसीसी स्पर्धांमधून झालेत ‘आऊट’

On: बुधवार, फेब्रुवारी 18, 2026 9:00 AM
Mitchell-Marsh
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ म्हटले की डोळ्यसमोर येतो ते जिंकलेले अनेक वनडे विश्वचषक. एक काळ असा होता जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाला क्रिकेटचा बॉस म्हटले जायचे. आयसीसी स्पर्धांमध्ये तर त्यांचा खूपच दरारा होता, मात्र २०२६च्या टी२० विश्वचषकात ते ग्रुप स्टेजमधूनच बाहेर झाले आहेत. ग्रुप बी मध्ये असलेल्या या संघाने त्यांचे श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्धचे सामने गमावले तर केवळ आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने २०२३मध्ये वनडे विश्वचषक जिंकला, त्यानंतर मात्र झालेल्या आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांना एकदाही विजेतेपद जिंकता आले नाहीत. कदाचित त्या घटनेनंतर ते कमनशिबी झाल्याचे दिसते.

ती घटना म्हणजे २०२३चा वनडे विश्वचषक जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मार्शच्या हातात बियरची बॉटल असून त्याने ट्रॉफीवर पाय ठेवलेले दिसत आहेत. त्याच्या या फोटोची त्यावेळी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. त्याने विश्वचषकाच्या ट्रॉफीचा अपमान केला, असे म्हटले जाऊ लागले.

या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया चार आयसीसी स्पर्धांच्या बाहेर झाली आहे. आधी ते २०२४च्या टी२० विश्वचषकातून बाहेर झाले. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती, पण अंतिम सामन्यात पोहोचले नाहीत. त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मधून ते बाहेर झाले. त्याचवर्षी झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ते अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाले. आता ते टी२० विश्वचषक २०२६मधून बाहेर झाले आहेत.

तसे २०२६च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत येण्याआधी ऑस्ट्रेलियाचे अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामध्ये पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांचा समावेश आहे. तसेच पहिल्या सामन्यात मार्शही खेळला नव्हता. त्यावेळी ट्रेविस हेडने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा शेवटचा साखळी सामना बाकी आहे. जो ओमानविरुद्ध २० फेब्रुुवारीला खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---