आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) आज (5 जून) रोजी भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये आठवा सामना खेळला जात आहे. न्यूयाॅर्कमध्ये असलेल्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक) , सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
आयर्लंड- पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेयर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट
15 वर्षांपूर्वी टी-20 विश्वचषकात भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ एकदाच भिडले होते. त्यावेळी भारतीय संघानं बाजी मारली होती. यंदाच्या टी20 विश्वचषकात हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आज भिडताना दिसत आहेत. भारत आणि आयर्लंड हे संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकूण 8 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये भारतीय संघाचं वर्चस्व राहिलं आहे. भारतानं 7 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
आजच्या सामन्यात आयर्लंड संघ भारतीय संघाचा कशाप्रकारे सामना करेल हे पाहणंदेखील अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारण आयर्लंडनं देखील मोठ्या संघांना बऱ्याचवेळा धूळ चारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी, आकाश चोप्रानं केलं जडेजाबद्दल वक्तव्य म्हणाला, “भारतीय संघाची सर्वात…”
6 चेंडूत 6 षटकार, मिचेल स्टार्कची कारकीर्द उद्ध्वस्त करण्यावर अडला होता युवा भारतीय खेळाडू
डेविड वाॅर्नरच्या निवृत्तीवर रिकी पाँटिंगनं दिली प्रतिक्रिया