टी२० विश्वचषकामध्ये रविवारपासून (२४ ऑक्टोबर) भारत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होईल. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. त्यातच दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्यात आतापर्यंत सुमारे १००० कोटींचा सट्टा लावला गेला आहे. विशेष गोष्ट म्हणजे बुकींची पहिली पसंती भारतीय संघ आहे. सट्टा मार्केटनुसार, नाणेफेकनंतर लगेचच हा आकडा सुमारे १५०० ते २००० कोटींपर्यंत वाढू शकतो.
माध्यमांतील वृत्तानुसार दुबईत देशभरातील अनेक बुकी उपस्थित आहेत. दुबईच्या एका मोठ्या सट्टेबाजाने नाव न छापण्याच्या अटीवर सट्टेबाजीचे दर आणि आवडत्या संघाबद्दल काही माहिती दिली आहे. सध्या भारतीय संघाचा दर ५७, ५८ आहे. ऑनलाइन बेटिंग साइटच्या माध्यमातून देशभरातील सर्व लहान-मोठे आणि हायप्रोफाईल बुकींनी या मोठ्या सामन्यावर करोडोंचा सट्टा लावला आहे.
बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी सध्या दुबई आणि अबू धाबी येथे उपस्थित आहेत, जे प्रत्येक सामन्यावर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणी काही वृत्तसंस्था बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशीही बोलले आहेत.
ते म्हणाले, ‘आमचे अधिकारी आणि स्थानिक एजन्सी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात, ज्यामध्ये खेळाडूची सुरक्षा आणि सर्व मुद्द्यांचा समावेश असतो.’ मात्र, त्यांनी १००० कोटींच्या सट्टेबाजीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली नाही. माहितीनुसार, देशभरातील पोलीस, विशेषत: गुन्हे शाखेच्या सायबर युनिट्स, अशा सर्व वेबसाइट्सवर नजर ठेवून आहेत जिथे ऑनलाइन बेटिंग रॅकेट चालू आहेत. ह्या एक सट्टेबाजी वेबसाइट्स आहेत, ज्या भारताबाहेरून कार्यरत आहेत, ज्यावर कोट्यावधी रुपयांचा सत्ता लावण्यात येतो.’
साहजिकच भारत-पाकिस्तान सामना दुबईत होत आहे, त्यामुळे अंडरवर्ल्ड यात हस्तक्षेप करेल. अंडरवर्ल्डमधील लोकांचा छंद क्रिकेट असतो आणि विशेषतः भारत-पाकिस्तान यात होणारे सामने. या सामन्यावर वेगवेगळ्या पद्धतीने सट्टा लावला जातो, मग सामन्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मार्गी लावले जातात. जेव्हा सामन्यासाठी बरेच पैसे खर्च केले जातात, तेव्हा बुकी खेळाडू किंवा सामना निश्चित करू शकतात अशी शक्यता असते. अशा परिस्थितीत बीसीसीआय किंवा आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी युनिट खेळाडूंवर लक्ष ठेवून असते.
महत्त्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपसाठी येण्यापूर्वी बाबरला काय म्हणाले पाकिस्तानी पंतप्रधान? स्वतः केला खुलासा
‘आता न्यूझीलंडला पळू द्यायचे नाही, पण भारतालाही सोडायचे नाही’, माजी पाक खेळाडूचे वक्तव्य
टी२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला नेहमीच केलयं चितपट; वाचा सर्व विजयांची कहाणी