भारतीय खेळाडूंनी बुधवारी (दि. 05 जुलै) जाहीर झालेल्या कसोटी रँकिंगमध्ये शानदार कामगिरी केली. एकीकडे फलंदाजांच्या कसोटी रँकिंगमध्ये अव्वल 10 खेळाडूंमध्ये रिषभ पंत यांने स्थान मिळवले. तसेच, कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये आर अश्विन याने, तर रवींद्र जडेजा याने कसोटी अष्टपैलू रँकिंगमध्ये अव्वलस्थान पटकावले.
आयसीसी कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल 10मध्ये फक्त एक भारतीय खेळाडू आहे. तो खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) होय. पंत मागील वर्षी अपघातात दुखापतग्रस्त झाल्यानंतर अजूनही मैदानाबाहेर आहे. ताज्या रँकिंगनुसार, पंत 758 गुणांसह दहाव्या स्थानी आहे. तसेच, स्टीव्ह स्मिथ 882 गुणांसह दुसऱ्या, तर केन विलियम्सन 883 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
अश्विनचे कसोटी गोलंदाजी रँकिंगमधील अव्वलस्थान कायम
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) ताज्या कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वलस्थान कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे. अश्विनचे सध्या 860 गुण आहेत. तसेच, गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी 826 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. अव्वल 10 गोलंदाजांमध्ये भारताकडून अश्विनव्यतिरिक्त 8व्या आणि 9व्या स्थानी अनुक्रमे जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा आहेत.
कसोटी अष्टपैलू रँकिंगमध्ये जडेजा अव्व्वलस्थानी कायम
कसोटी गोलंदाजी रँकिंगमध्ये आर अश्विनने पहिला क्रमांक पटकावल्यानंतर, रवींद्र जडेजा यानेही कसोटी अष्टपैलू रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अश्विनचाही समावेश असून तो जडेजानंतर दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. एकीकडे जडेजा 434 गुणांसह पहिल्या स्थानी आहे, तर दुसरीकडे अश्विन 352 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये जो रूटही 272 गुणांसह 7व्या स्थानी पोहोचला आहे. (ICC test ranking R Ashwin Remain number one test bowler and Ravindra Jadeja Number One test Allrounder)
महत्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटी गाजवणारा स्मिथ कसोटी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान, पण अव्वलस्थान ‘या’ दिग्गजाकडे
‘आता तरी लाज वाटू दे बुमराह’, सर्जरीनंतर लेकीसोबत क्रिकेट खेळणाऱ्या विलियम्सनच्या व्हिडिओवर चाहत्याची कमेंट