यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा भारतीय संघात शानदार कमबॅक झाला आहे. तो कार अपघातामुळे बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. पंतनं बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी केली. त्यानं न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात सर्वाधिक 20 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात तो 99 धावा करून बाद झाला. आता त्याला त्याच्या या शानदार कामगिरीचं फळ मिळालं आहे.
आयसीसीनं नुकत्याच जारी केलेल्या रँकिंगनुसार, रिषभ पंत भारताचा दुसरा सर्वोत्कृष्ट कसोटी फलंदाज आहे. त्यानं विराट कोहलीला मागे टाकत सहावं स्थान पटकावलं. बंगळुरू कसोटीनंतर रिषभ पंतला तीन स्थानांचा फायदा झाला. कोहलीनं देखील दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकलं होतं. मात्र त्याला एका स्थानाचं नुकसान झालं आहे.
ताज्या रँकिंगमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माला देखील नुकसान झालं. रोहित टॉप 10 मधून आधीच बाहेर होता. आता तो दोन स्थान घसरून 15व्या स्थानावर आला आहे. सध्या कसोटीत युवा यशस्वी जयस्वाल भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. यशस्वी कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे.
इंग्लंडचा जो रुट सध्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. त्यानं 917 रेटिंग गुणासह आपलं अव्वल स्थान खूप मजबूत केलंय. दुसऱ्या स्थानावर असलेल्या केन विल्यमसनचे 821 गुण आहेत. विल्यमसन सध्या दुखापतीमुळे कसोटी क्रिकेत खेळत नाहीये. त्यामुळे रुटच्या पहिल्या स्थानाला सध्या तरी काही धोखा नाही.
ताज्या कसोटी रँकिंगमधील सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे, टॉप 10 मध्ये एकही पाकिस्तानी फलंदाज नाही. पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट रँकिंग असलेला फलंदाज आगा सलमान आहे, जो सध्या 14व्या स्थानावर आहे.
हेही वाचा –
कुलदीप यादवची आयसीसी कसोटी क्रमवारीत झेप; बुमराह अव्वल स्थान राखून!
IND VS NZ; पंत की जुरेल? दुसऱ्या कसोटी सामन्यात विकेटकीपिंग कोण करणार?
मेगा लिलावापूर्वी मोठा गेम होणार! दिल्ली कॅपिटल्स पंतला रिलिज करण्याची शक्यता, हे दोन संघ रिषभच्या मागे