आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२१ सालच्या आपल्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. वनडे व टी२० संघात भारतीय खेळाडूंना जागा बनवण्यात अपयश आले होते. मात्र, कसोटी संघात भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा राखला. संपूर्ण वर्षभरात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारताच्या तीन खेळाडूंना या संघात स्थान मिळाले. पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) विजेतेपद जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याच्याकडे या संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. (ICC Test Team Of The Year)
तीन भारतीय खेळाडूंना संघात स्थान
२०२१ मधील वनडे व टी२० संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान बनविण्यात अपयश आले होते. मात्र, कसोटी संघात भारतीय खेळाडूंना निश्चित स्थान असेल अशी सर्वांना अपेक्षा होती. अपेक्षेनुसार, संघाचा उपकर्णधार व वरिष्ठ सलामीवीर रोहित शर्मा, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत व प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हे कसोटी संघात जागा बनवण्यात यशस्वी ठरले. (Rohit Sharma, Rishabh Pant & R Ashwin In ICC Test Team Of The Year 2021)
भारतीय संघाने गतवर्षी १३ कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला. त्यापैकी ८ सामन्यात विजय तर दोन सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला. तर तीन सामने अनिर्णित राहिले. भारताने २०२१ मध्ये विदेशी भूमीवर शानदार कामगिरी करून दाखवली. मात्र, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता.
आयसीसीच्या कसोटी संघात भारत व पाकिस्तानचे प्रत्येकी तीन, न्यूझीलंडचे दोन, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूला या संघात संधी मिळाली आहे. संघाचे नेतृत्व न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याच्याकडे दिले गेले.
२०२१ चा आयसीसी कसोटी संघ-
रोहित शर्मा, दिमुथ करूणारत्ने, जो रूट, केन विलियम्सन (कर्णधार), मार्नस लॅब्युशेन, फवाद आलम, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कायले जेमिसन, हसन अली, शाहिन शाह आफ्रीदी.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मृती मंधाना | एकट्या पोरीने राखली १४० कोटी भारतीयांची लाज; विराट, रोहित सगळेच झिरो (mahasports.in)