ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात यजमान भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल. आता विश्वचषकाचे वेळापत्रक देखील आले असून, सर्व तयारी सुरू असताना पाकिस्तानच्या क्रीडामंत्र्यांनी पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर पडू शकतो असे म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर आता आयसीसीने देखील तयारी सुरू केली असून, पाकिस्तानच्या जागी अन्य संघाला संधी देण्याची तयारी आयसीसीने दाखवली आहे.
पाकिस्तानी देखील आपला संघ विश्वचषकासाठी भारतात न पाठवण्याची भूमिका घेतलेली. मात्र, अखेरीस त्यांनी माघार घेत विश्वचषकात सहभाग नोंदवण्याचे निश्चित केले. मात्र, असे असतानाच आता पाकिस्तानचे क्रीडामंत्री एहसान मजारी यांनी भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही तर, आम्ही पाकिस्तानचा संघ भारतात पाठवणार नाही. अन्यथा, आम्ही देखील तटस्थ ठिकाणी सामना खेळू. अशी भूमिका घेतली. पाकिस्तान संघाच्या या सातत्याने बदलणाऱ्या भूमिका पाहता आयसीसीने एक मोठा निर्णय घेण्याचा विचार सुरू केला आहे.
पाकिस्तानने ऐनवेळी विश्वचषकातून माघार घेतल्यास आयसीसी, विश्वचषक क्वालिफायर्स स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिलेल्या स्कॉटलंड संघाला विश्वचषकात सहभागी करून घेऊ शकते. नुकत्याच झिम्बाब्वे येथे समाप्त झालेल्या क्वालिफायर्स स्पर्धेत श्रीलंका व नेदरलँड्स संघांनी विश्वचषकासाठी पात्रता मिळवली होती.
स्कॉटलंड संघाने या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, निर्णायक सामन्यात नेदरलँड्स संघाने त्यांना पराभूत केलेले. त्यामुळे त्यांची विश्वचषकातील प्रवेशाची संधी हुकली होती. मात्र, पाकिस्तानने अगदी टोकाचा निर्णय घेतला तर, स्कॉटलंड संघ या विश्वचषकात खेळताना दिसू शकतो. असे झाल्यास दहा संघांच्या या स्पर्धेत दोन सहयोगी देश दिसू शकतात.
(ICC Thinking Scotland Will Replace Pakistan In ODI World Cup If Pakistan Pulled Out)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
सातासमुद्रापार विश्वविजेती बनली सातारची आदिती! तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये घेतला सुवर्णवेध