---Advertisement---

फलंदाजांसाठी हानिकारक ठरणारा ‘तो’ नियम आयसीसीने बदलला, सूर्या-विराटने सोसलेले नुकसान

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्या आधी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणाऱ्या या अंतिम सामन्याआधी अनेक वेळा वादग्रस्त ठरणारा सॉफ्ट सिग्नल ‌ हा निर्णय रद्द केला. त्यामुळे यापुढे क्रिकेटमध्ये या निर्णयाचा वापर होताना दिसणार नाही.

आयसीसीच्या क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले. मागील काही काळापासून अनेक क्रिकेटपटूंनी या निर्णयावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा निर्णय रद्द केला जाऊ शकतो असे जाणकार म्हणत होते. अखेर आयसीसीने त्याबाबत पाऊले उचलत, हा निर्णय रद्द केला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून त्याची अंमलबजावणी होईल. याबाबतची कल्पना दोन्ही संघांना दिली गेलीये‌‌.

काय आहे नियम

सॉफ्ट सिग्नल निर्णय हा पूर्णता पंचांच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. एखादा झेल पूर्ण झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी अनेकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. मात्र, त्यावेळी मैदानी पंचांनी पहिला निर्णय काय दिला आहे, हे पाहिले जाते. तिसऱ्या पंचांना झेल योग्य आहे की नाही हे समजण्यासाठी कोणताही पुरावा नसल्यास, सॉफ्ट सिग्नल म्हणजे मैदानी पंचांनी दिलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो.

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान 2021 मध्ये झालेल्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव याच्या विरोधात असा निर्णय गेला होता. डेव्हिड मलान याने टिपलेला झेल योग्य आहे की नाही याबाबत तिसऱ्या पंचांना कोणताही पुरावा मिळाला नव्हता. त्यावेळी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला गेलेला. याव्यतिरिक्त विराट कोहली हा देखील अनेक वेळा या निर्णयात शिकार ठरलेला.

(ICC To Abolish Soft Signal Begining India Australia WTC Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
VIDEO:..आणि गावसकरांनी शर्टवर घेतला धोनीचा ऑटोग्राफ, पाहा आयपीएलमधील सर्वात भावनिक क्षण
धोनीने चेन्नईत खेळला अखेरचा सामना? चेपॉकवर फेरी मारत चाहत्यांना म्हणाला, “थॅन्कू”, पाहा व्हिडिओ 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---