मुंबई । कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय क्रिकेट पंच अनिल चौधरी यांची यांचा झाडावर चढून मोबाइलवर बोलत असतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता त्यांच्यामुळेच गावात मोबाइल नेटवर्क आले असून गावकऱ्यांनी याबद्दल आनंद व्यक्त करत चौधरी यांचे आभार मानले आहेत.
चौधरी लॉकडाऊनच्या दरम्यान उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यामधील डांगरोल गावात अडकून पडले होते. मोबाइल नेटवर्क नसल्याने त्यांचा कुणाशी संपर्क होत नव्हता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ऑनलाईन कार्यशाळेत देखील ते भाग घेऊ शकले नाही. त्यानंतर गावात मोबाइलचे नेटवर्क सुधारण्यासाठी चौधरी यांनी पुढाकार घेतला. त्यात त्यांना यश आले असून आता गावात मोबाइलला चांगले नेटवर्क आले आहे.
चौधरी म्हणाले, “मोबाइलला चांगले नेटवर्क नसल्यामुळे मी आयसीसीच्या कार्यशाळेत भाग घेऊ शकलो नाही. त्यामुळे मला दिल्लीला जावे लागत होते. त्यामुळे मी एका मोबाइल कंपनीशी संपर्क साधला. कंपनीने मोबाइलच्या नेटवर्कमध्ये सुधारणा करून दिली. आता गावात मोबाइलला चांगली रेंज येत आहे. शिवाय गावात राहून सर्व कामे करू शकतो. त्यासाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही.”
“सध्याच्या घडीला ग्रामीण भागातील विशेष करून विद्यार्थ्यांना नेटवर्कची खूपच गरज होती. लोकांना फोनवर बोलण्यासाठी आता झाडावर चढण्याची गरज नाही. गावातील मोबाइलचे नेटवर्क सुधारल्याने सर्व ग्रामस्थांनी माझे आभार मानले. गावासाठी ही मोठी गोष्ट आहे,” असेही चौधरी यांनी सांगितले.
चौधरी हे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेत पंच म्हणून काम पाहत होते. मात्र ही मालिकामध्येच थांबवण्यात आली. त्यामुळे ते 16 मार्च रोजी डांगरोल गावी आले. त्यानंतर त्यांना मोबाइल नेटवर्कच्या समस्येला तोंड द्यावे लागले. त्यांचे गाव दिल्लीपासून जवळपास 80 किलोमीटर दूर आहे. अनिल चौधरी यांनी 20 वनडे सामन्यात आणि 28 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे.
जलंधर येथील एका महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर सुभाष म्हणाले की, “चौधरी यांनी मोबाइलचे नेटवर्क सुधारण्यासाठी पुढाकार घेतला नसता तर ही समस्या सुटली नसती. पंच साहेबांची मेहनत कामी आली. आता मी गावात ऑनलाइन वर्ग घेऊ लागलोय.”
ट्रेंडिंग घडामोडी –
‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने माझे आयुष्य बदलले’, पहा कोण म्हणतंय हे…
गावसकरांचा ‘तो’ सल्ला पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गजासाठी ठरला मौल्यवान






