आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिलांच्या विश्वचषक स्पर्धांच्या यजमान शहरांची नावे सोमवारी (२२ ऑगस्ट) जाहीर केली आहे. यामध्ये आयसीसी १९ वर्षाखालील टी२० विश्वचषक २०२३ आणि आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ या स्पर्धांसाठी ठिकाण निश्चित झाले आहे. या दोन्ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहेत. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा जानेवारी २०२३ मध्ये होईल, तर वरिष्ठ महिला स्पर्धा १० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होईल.
जीकेबेरहा (पूर्वीचे पोर्ट एलिझाबेथ), पार्ल आणि केपटाऊन शहरे आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे आयोजन करतील, तर १९ वर्षाखालील महिला टी२० विश्वचषकाच्या पदार्पणाची स्पर्धा बेनोनी आणि पॉचेफस्ट्रूम येथे होणार आहे.
वरिष्ठ महिलांच्या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी आठ संघ निश्चित झाले आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज यांचा समवेश आहे. उर्वरित दोन संघ सप्टेंबर २०२२मध्ये युनायटेड अरब अमिराती येथे होणाऱ्या आयसीसी महिला टी२० विश्वचषक पात्रता फेरीत ठरवले जातील.
“आयसीसी महिला टी२० विश्वचषक आयोजित करण्यासाठी तीन शहरांची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे,” असे स्पर्धेचे संचालक, रसेल ऍडम्स म्हणाले आहेत.
“इस्टर्न आणि वेस्टर्न केप ही उत्कृष्ट सुविधा आणि पायाभूत सुविधांसह प्रमुख क्रिकेट आणि पर्यटन स्थळे आहेत. या स्पर्धांना उपस्थित राहणाऱ्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा हा एक संस्मरणीय आणि अनोखा आफ्रिकन उत्सव बनवण्यासाठी ही ठिकाणे पुढे येतील यात शंका नाही,” असेही ऍडम्स यांनी पुढे म्हटले आहे.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक ही १६ संघांची स्पर्धा असेल. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, झिम्बाब्वे, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया, नेदरलँड्स या १५ संघांचे स्थान निश्चित झाले आहे. तर सप्टेंबरमध्ये आफ्रिका क्लालिफायरमध्ये अंतिम संघ निश्चित केला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा सिकंदरसमोर भारत अपराजित! टीम इंडियाचा झिम्बाब्वेला व्हाईटवॉश
शुबमन गिलने सगळ्यांना टाकले मागे, वनडे क्रिकेटमध्ये रचला ‘हा’ बलाढ्य विक्रम
झिम्बाब्वे क्रिकेटच्या आर्थिक समस्यांवर भारतीय खेळाडूनेच उठवला आवाज; म्हणाला…