‘लोक कमी स्कोरवाल्या महत्त्वपूर्ण खेळी विसरून जातात’, महिला वनडे विश्वचषकापूर्वी व्यक्त झाली हरमनप्रीत कौर

'लोक कमी स्कोरवाल्या महत्त्वपूर्ण खेळी विसरून जातात', महिला वनडे विश्वचषकापूर्वी व्यक्त झाली हरमनप्रीत कौर

भारतीय महिला टी२० क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) मागील काही दिवसांपासून तिच्या खराब फॉर्ममधून जात होती. मात्र, सगळे दिवस सारखे नसतात हे तिने दाखवून दिले आहे. तिने आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२पूर्वी(ICC Womens World Cup 2022) झालेल्या पहिल्या सराव सामन्यात जबरदस्त शतक ठोकत पुनरागमन केले. विश्वचषकापूर्वी हरमनप्रीतने माध्यमांशी चर्चा केली. यावेळी तिने टीकाकारांना खडेबोल सुनावले.

माध्यमांशी बोलताना ती म्हणाला की, लोक नेहमी लहान असलेल्या, पण संघासाठी खेळलेल्या महत्त्वपूर्ण खेळी विसरून जातात. यावेळी हरमनप्रीतने स्वत:ला मानसिकरीत्या मजबूत ठेवण्यासाठी कशाप्रकारे मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेतली हेही सांगितले.

सन २०१७ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या १७१ धावांच्या खेळीमुळे, तिने केलेल्या ३० आणि ४० धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीकडे कोणाचे लक्ष गेले नाही, असे हरमनप्रीतला वाटते. “मला माहिती आहे की, लोक माझ्या १७१ धावांच्या खेळीचीच अधिक चर्चा करतात. मीदेखील स्वत:साठी ते मानक ठरवले आहे. त्यामुळेच माझ्या ३०-४० धावांच्या छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळीला महत्त्व दिले जात नाही.”

हरमनप्रीतने न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांच्या वनडे मालितील पहिल्या ३ सामन्यात फक्त ३३ धावा केल्या होत्या. त्यानंतर तिला चौथ्या सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. यानंतर तिने शेवटच्या सामन्यात ६३ आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात १०४ धावा कुटल्या होत्या.

ती म्हणाली की, “होय, नक्कीच आपल्या फलंदाजीबाबत माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझ्या कामगिरीत खूप चढ-उतार राहिले, परंतु मागील शतकाने माझा आत्मविश्वास शिखरावर पोहोचला आहे.”

“न्यूझीलंडविरुद्धची खेळी माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होती. मी त्यात चांगली लय मिळवली आणि आता ही लय कायम ठेवणे माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मला स्वत:कडून अपेक्षा आहे  आणि मला संघातील आपले महत्त्व माहितीये. जेव्हा तुम्ही धावा करत नसता, तेव्हा खूप वाईट वाटते,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली.

हरमनप्रीतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत ३ कसोटी सामने, १११ वनडे सामने आणि १२१ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीत तिने ७.६० च्या सरासरीने ३८ धावा केल्या आहेत. वनडेत तिने ३४.१५ च्या सरासरीने २६६४ धावा केल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी२०त तिने २६.३५ च्या सरासरीने २३१९ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अश्विनचा फॅन बनला ‘ऑसी’ फलंदाज; गोडवे‌ गात म्हणाला…

कोरोना संक्रमित राउफच्या जागी ‘या’ हॅट्रिकवीराची पाकिस्तानच्या कसोटी संघात वर्णी, करणार पुनरागमन

भारतीय दिग्गजाने टी२० विश्वचषकासाठी केली संभाव्य संघाची भविष्यवाणी; ‘या’ प्रमुख खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.