एकदिवसीय क्रिकेटच्या नियमांमध्ये वेेळोवेळी बदल होत आले आहेत. यामध्ये मग 20 षटकांचा पॉवर प्ले असो की दोन्ही एन्डकडून गोलंदाजीसाठी दोन नवे चेंडू असोत. हे सर्व नियम फलंदाजांच्याच पथ्यावर पडले आहेत.
नव्वदच्या दशकात 270 पेक्षा जास्त धावा पाहून भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळायचे. मात्र गेल्या एक- दिड दशकांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने 300 किंवा त्यापेक्षा जास्त धावा होत आहेत.
यामध्ये कहर म्हणजे 19 जूून जूनला इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 50 षटकात 481 म्हणजेच जवळपास 500 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील एखाद्या संघाने केलेल्या या सर्वोच्च धावा आहेत.
इंग्लंड संघाच्या या खेळीने हे दाखवून दिले आहे की एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता 500 धावा करणे अवघड नाही.
याच पार्श्वभूमीवर 2019 साली होणाऱ्या एकदिवसीय विश्वचकात 500 धावा करू शकणाऱ्या संघाचा आढावा घेणार आहोत.
1.भारत
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 400 पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांच्या यादित भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारताने आयपर्यंत पाचवेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने 300 पेक्षा अधिक धावा करत आला आहे. डिसेंबर 2017 ला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 वेळा 300 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला संघ बनला होता.
आजच्या घडीला भारताकडे विराट, धोनी, रोहित शर्मा, शिखर धवन आणि हार्दिक पंड्या सारखे अनुभवी आणि स्फोटक फलंदाज आहेत.
भारताची ही फलंदाजी आणि इंग्लंडमधील आत्ताच्या खेळपट्यांचा विचार करता 2019 साली इंग्लंडमध्ये होत असलेल्या विश्वचषकात भारतीय संघ 500 धावसंख्या नक्कीच उभारू शकतो.
2.दक्षिण अफ्रिका
दक्षिण अफ्रिका जागातील एकमेव संघ आहे ज्या संघाने 400 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग यशस्वीपणे केला आहे.
12 मार्च 2006 साली ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 400 धावसंख्या करण्याचा पहिला मान मिळवला. मात्र पुढच्या तीन तासातचं दक्षिण अफ्रिकेने या धावांचा पाठलाग करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सहा वेळा 400 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव संघ आहे.
दक्षिण अफ्रिकेचा महत्वाचा फलंदाज एबी डिव्हीलियर्स जरी क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्यांची फलंदाजांची फळी मात्र मजबूत आहे. हाशिम आमला सारखा भरवशाचा फलंदाज आणि फाफ डूप्लेसीस, डेविड मिलर आणि क्विंटॉन डिकॉक यांच्या स्फोटक फलंदाजीत 500 धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे.
3.इंग्लंड
कसोटी क्रिकेट स्पेशलिस्ट म्हणून इंग्लंड संघाला ओळखले जाते. पण गेल्या काही वर्षांमध्ये इंग्लंडची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी सुधारत आहे.
आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारी अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडची एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 धावा करण्याची संधी थोेडक्यात हुकली.
19 जूनला झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने 50 षटकात 481 धावा केल्या. ही धावसंख्या एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनवेळा 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
जॉस बटलर, एलेक्स हेल्स, जेसन रॉय, जॉनी बेअस्ट्रो यांच्या सारखी फलंदाजीची तगडी फळी आणि मायदेशात खेळण्याचा फायदा इंग्लंडला 2019 च्या विश्वचषकात 500 धावा करण्यासाठी होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या:
–संपूर्ण यादी: पुढील पाच वर्षांचे भारतीय संघाचे वेळापत्रक घोषित
–आज भारत-पाकिस्तान सामन्याने सुरु होणार दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा






