क्रिकेटजगताला त्यांचा पहिलावहिला कसोटी चॅम्पियन मिळाला आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदावर केन विलियम्सन व कंपनीने आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंड संघाने साउथॅम्प्टन येथील द एजेस बाउल मैदानावर भारतीय संघाला अंतिम सामन्यात ८ गडी राखून पराभूत केले आहे. या ऐतिहासिक सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा दुर्दैवी पराभवानंतर चाहत्यांना माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीची आठवण झाली आहे.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर धोनीचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहे. खासकरुन आठ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये यजमानांविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याची चाहत्यांनी आठवण काढली आहे. त्या सामन्यात इंग्लंडचे वर्चस्व असताना धोनीने आपल्या नेतृत्वाच्या कौशल्याने हा सामना जिंकला होता. आठ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडला त्यांचाच भूमीवर पराभूत करत प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.
हा एक योगायोग आहे की, ज्यादिवशी भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वखाली चषक जिंकला होता. त्याचदिवशी भारताला विराट कोहलीच्या नेतृत्वात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला.
India in 10 ICC finals:
Under Dhoni’s captaincy – Won 3 (out of 4 finals)
All other captains – Won 1 (out of 6 finals)#WTC2021Final
— Bharath Seervi (@SeerviBharath) June 23, 2021
Kohli maybe GOAT, but definitely not on par with Dhoni when it comes to captaincy
— दीपेन्द्र (@dpendra_chauhan) June 23, 2021
That's the Difference between leader and captain 😎🏆@MSDhoni • #MSDhoni • #WhistlePodu pic.twitter.com/w1IAoAp1n4
— DHONI Era™ 🤩 (@TheDhoniEra) June 23, 2021
His legacy will remain for eternity ❤️@MSDhoni • #MSDhoni • #WhistlePodu pic.twitter.com/e5LwbK8Ohs
— DHONI Era™ 🤩 (@TheDhoniEra) June 23, 2021
Game Leader OR Game Reader; whatever you say❤
The undispited Dean of Captaincy University 👑#Dhoni pic.twitter.com/dZggm9V3SQ— Akshit Sharma🇮🇳 (@ShrmaGka_Ladka) June 24, 2021
#MSDhoni achievements as a captain of Indian cricket team.#Dhoni pic.twitter.com/9DiW6DH3sZ
— Gursewak Singh (@U_r_unique_love) June 24, 2021
२३ जून २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ७ विकेट्स गमावत १२९ धावा केल्या होत्या. अंतिम सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला १३० धावांची गरज होती. परंतु इंग्लंड संघाने ८ विकेट गमावत १२४ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हा रोमांचक सामना ५ धावांनी जिंकला होता. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर संपूर्ण मालिकेत शानदार फलंदाजी करणाऱ्या शिखर धवनला मालिकावीर निवडण्यात आले होते.
महेंद्रसिंग धोनी हा असा एकमेव कर्णधार आहे, ज्याने आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपातील आयसीसी चषक जिंकले आहेत. त्यांने भारताला २८ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकवून दिला होता. त्याच्या नेतृत्वात भारतने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी, २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला आहे.
महत्वाच्या बातम्या
सुवर्णसंधी गमावली! WTC अंतिम सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाचे ‘इथे’ही मोठे नुकसान
मैदानातील वैर विसरुन विजेता संघनायक केनने विराटला मारली मिठी, भारतीय चाहत्यांकडून भरभरुन कौतुक