अलिकडेच, भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका (Border Gavaskar Trophy) खेळली गेली. या मालिकेत जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) दमदार गोलंदाजी केली. त्याने मालिकेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. या शानदार कामगिरीसाठी जसप्रीत बुमराहला मालिकावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला होता.
वास्तविक, आयसीसीच्या (ICC) ताज्या कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अव्वल स्थानावर कायम आहे. आयसीसीने बुधवारी (22 जानेवारी) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत जसप्रीत बुमराह 907 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) दुसऱ्या स्थानावर आहे. पॅट कमिन्सचे रेटिंग गुण 841 आहेत.
जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्सनंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) तिसऱ्या क्रमांकावर आहे. कागिसो रबाडाचे 837 रेटिंग गुण आहेत. या यादीतील इतर गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानचा नोमान अली (Noman Ali) टॉप-10 गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या नौमन अलीचे 761 रेटिंग गुण आहेत.
त्याच वेळी, भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeaj) अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणून कायम आहे. जडेजा 400 रेटिंग गुणांसह अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा मार्को जॅन्सन (Marco Jansen) आहे. मार्को जॅन्सन 294 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशचा मेहदी हसन मिराज 263 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG; भारताने जिंकला टाॅस! शमीला वगळले, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असणार की नाही? BCCIच्या सचिवांनी दिले उत्तर
IND vs ENG; पहिलाच टी20 सामना अन् भारतीय खेळाडूंच्या निशाण्यावर 3 मोठे रेकाॅर्ड्स