भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला की नेहमीच काही न काही विक्रम करत असतो. पण त्याला अजूनही आयपीएलचे विजेतेपद मात्र मिळवता आलेले नाही.
त्यामुळेच आईसलँड क्रिकेटने विराटला ट्रोल केले आहे. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेयर केला आहे, ज्यात गौतम गंभीर, डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा यांच्याकडे आयपीएलची ट्राॅफी ( आयपीएल कप) आहे. तर विराटकडे काॅफीचा कप आहे.
तसेच ” आमचे प्रायोजक @reddit_cricket ने आयपीएल कर्णधारांनी त्यांचे कप हातात घेतलेल्याचा हा मस्त फोटो पोस्ट केला आहे. ” असे या फोटोला आईसलँड क्रिकेटने कॅप्शन दिले आहे.
Our sponsors @reddit_cricket have posted this cute picture of the IPL captains holding their cups. pic.twitter.com/hu3FHcOwfS
— Iceland Cricket (@icelandcricket) May 2, 2018
विराट आयपीएलमध्ये पहिल्या मोसमापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत आहे. यासंघाने आत्तापर्यंत 2009, 2011 आणि 2016 असे 3 वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. पण त्यांना एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.
त्यातील 2016 मध्ये बेंगलोरने विराटच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, पण त्यावेळेस सनरायझर्स हैद्राबादने त्यांना पराभूत करुन विजेतेपद मिळवले होते.
विराट 2013 पासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–आता गुरू जस्टिन लॅंगर दाखवणार आॅस्ट्रेलियाला मार्ग, प्रशिक्षकपदी नियुक्त
–दिल्ली डेअरडेविल्सच्या तीन पोरांनी राजस्थान राॅयल्सला रडवले
–हा दिग्गज म्हणतोय मुंबई पुढील सहाही सामने जिंकणारच!