महान टेनिसपटू राॅजर फेडरर आणि विक्रम या अशा गोष्टी आहेत ज्यांची सतत चर्चा होते. परंतू आज हा खेळाडू पुन्हा एकदा दोन कारणामुळे चर्चेत आला आहे.
कमबॅक-
एक म्हणजे या दिग्गजाने आपण या मोसमात पुन्हा कोणती स्पर्धा खेळून कमबॅक करणार आहे हे घोषीत केले आहे. त्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण ११ जुन रोजी मर्सडिज कप अर्थात स्टुटगार्ड ओपनमध्ये कमबॅक करणार असल्याचे घोषीत केले आहे.
मार्च महिन्यात तो शेवटची स्पर्धा खेळला आहे. मायामी ओपन स्पर्धेत तो दुसऱ्याच फेरीत बाहेर गेला होता. तेव्हापासून तो टेनिसपासून दुर आहे.
सलग ९०० आठवडे एटीपी क्रमवारीत टाॅप २५मध्ये-
तब्बल सलग ९०० आठवडे एटीपी क्रमवारीत टाॅप २५मध्ये रहाण्याचा विक्रम हा खेळाडू करणार आहे. आजपर्यंत टेनिस जगतात अशी कामगिरी कुणालाही जमली नाही.
आंद्रे आगासी हा ९१० आठवडे एटीपी क्रमवारीत टाॅप २५मध्ये राहिला आहे परंतु तो ही कामगिरी सलग ९०० किंवा त्यापेक्षा जास्त आठवडे हे करु शकला नाही.
फेडरर पाठोपाठ एटीपी क्रमवारीत टाॅप २५मध्ये जिम्मी काॅनोर्स हे सलग ८६५ आठवडे राहिले आहेत. ते १९७३ ते १९९० या काळात सलग ८६५ आठवडे एटीपी क्रमवारीत टाॅप २५मध्ये होते.
फेडरर नोव्हेंबर २००० मध्ये प्रथम एटीपी क्रमवारीत टाॅप २५मध्ये आला परंतु एकाच आठवड्यात बाहेर फेकला गेला. त्यानंतर त्याने फेब्रुवारी २००१ मध्ये एटीपी क्रमवारीत टाॅप २५मध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यानंतर हा खेळाडू कधीही टाॅप-२५ मधून बाहेर गेला नाही.
८९९ आठवडे म्हणजे २०६ महिने किंवा तब्बल १७ वर्ष तो या क्रमवारीत टाॅप २५ मध्ये राहिला.
गेल्याच महिन्यात एटीपी क्रमवारीत टाॅप ४ मध्ये ७०० आठवडे रहाण्याचा विक्रम त्याने केला होता. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.
राॅजर फेडररची एटीपी क्रमवारीतील गमतीशीर आकडेवारी-
९०० आठवडे- एटीपी क्रमवारीत टाॅप २५ मध्ये
७०० आठवडे- एटीपी क्रमवारीत टाॅप ४ मध्ये
६०० आठवडे- एटीपी क्रमवारीत टाॅप ३ मध्ये
५०० आठवडे- एटीपी क्रमवारीत टाॅप २ मध्ये
३०० आठवडे- एटीपी क्रमवारीत अव्वल स्थानी
महत्त्वाच्या बातम्या –
–मलिंगाला श्रीलंकाकडून खेळण्यापेक्षा मुंबई इंडियन्स प्रिय
–धोनीच्या पिण्याच्या पाण्याचा खर्च ऐकूण थक्क व्हाल!
–Video- कोहली फॅन्सकडून सचिनच्या चाहत्यांना जोरदार प्रतित्तोर