---Advertisement---

विजेतेपद कायम राखण्याच्या प्रयत्नात पहाटे 3.33 वाजेपर्यंत लढला कार्लोस अल्कराझ! शेवटी बेन शेल्टनने मारली बाजी, US Open…

On: गुरूवार, सप्टेंबर 10, 2026 10:35 AM
---Advertisement---

स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्कराझचे यूएस ओपन विजेतेपद कायम राखण्याचे स्वप्न भंगले. यूएस ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या अल्कराझला स्थानिक खेळाडू बेन शेल्टन याने चांगलेच आव्हान दिले. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी (9 सप्टेंबर) रात्री 11 वाजता सुरू झालेल्या या थरारक सामन्याचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पहाटे लागला.

आर्थर ऍश स्टेडियममध्ये खेळला गेलेला हा सामना जवळपास साडेचार तास रंगला. उशिरा निकाल लागला असला तरी प्रेक्षकांचा उत्साह कायम होता. नवव्या मानांकित शेल्टनने हा सामना 6-7 (5-7), 6-1, 6-3, 1-6, 7-6 (10-7) असा जिंकला. त्याच्या या विजयामुळे 23 वर्षांनंतर प्रथमच अमेरिकेला पुरुष एकेरीमध्ये स्थानिक विजेता मिळण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

तसेच हा सामना या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात उशिरा संपलेला सामना ठरला आहे. उपांत्य फेरीत शेल्टनसमोर अमेरिकेच्याच फ्रान्सिस टियाफोचे असणार आहे.

शेवटी यूएस ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद स्थानिक खेळाडूने 2003 मध्ये जिंकले होते. ऍंडी रॉडिकने तेव्हा स्पेनच्या हुआन कार्लोस फेरेरो याला 6–3, 7–6(7–2), 6–3 असे पराभूत करत ऐतिहासिक विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर कोणत्याही स्थानिक पुरुष खेळाडूने एकेरीमध्ये ही कामगिरी केलेली नाही.

सामना संपल्यानंतर शेल्टन म्हणाला, “ते एक युद्ध होतं, एक महाकाव्यीय सामना, खूपच शारीरिक ताकदीचा. कार्लोस वयाच्या अवघ्या 23व्या वर्षीच या खेळातील सर्वश्रेष्ठ विजेत्यांपैकी एक आहे. तो कधीकधी ज्या काही गोष्टी करतो त्या अविश्वसनीय असतात. माझ्या कारकिर्दीतील हा सर्वात आनंददायक सामना होता, हे नक्की.”

शेल्टनने त्याच्या 17 प्रयत्नात अव्वल तीन खेळाडूंपैकी एकालाही पराभूत केले नव्हते. तसेच अल्कराझविरुद्ध त्याला खेळलेल्या मागील तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा विजय त्याच्यासाठी महत्त्वाचाच आहे.

अल्कराझ जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. तसेच तो दुखापतीमुळे दीर्घकाळ कोर्टपासून दूर होता. तो दुखापतीतून सावरल्यानंतर प्रथमच स्पर्धेत सहभागी झाला होता. सामन्याच्या निकालानंतर तो म्हणाला, “सामना अटीतटीचा होता. त्यामुळे शेवटी विजय न मिळाल्याबद्दल मी निराश होणार नाही.”

यंदाची ही स्पर्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अनेक सामन्यांचे निकाल उशिरा लागले आहेत. या सामन्यातही अल्कराझ एका क्षणाला थकलेला दिसत होता. एका क्षणी तर त्याला चेंडू कोर्टमध्ये ठेवणेही अवघड होताना दिसेल. तसेच त्याला उलट्याही झाल्या होत्या.

सामना गमावला असला तरी अल्कराझच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सर्वात उशिरा सामना जिंकण्याचा आणि पराभव स्वीकारण्याचा हा विक्रम आहे. 2022 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत अल्कराझने ईटलीच्या यानिक सिन्नरविरुद्धचा सामना स्थानिक वेळेनुसार पहाटे 2.50 वाजता संपवून विजय मिळवला होता. आता हा विक्रम मागे पडला आहे. यावेळी पहाटे 3.33 वाजता संपलेल्या सामन्यात त्याला शेल्टनविरुद्ध पराभव पत्कारावा लागला आहे. (US Open 2026 Ben Shelton Beats Carlos Alcaraz in 5 set match finish at 3.33 AM)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---