भारतीय संघाचे खेळाडू अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. कधी सातत्याने संघाबाहेर असल्यामुळे, तर कधी एखाद्या सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हादेखील खराब फॉर्माचा सामना करत असताना चांगलाच ट्रोल झाला होता. अशात त्याला एका क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विराटच्या चाहत्यांनी त्या क्रिकेट बोर्डाचा डाव हाणून पाडला. चला नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…
विराट कोहली (Virat Kohli) याला ट्रोल करणारे क्रिकेट बोर्ड इतर कुठले नसून आईसलँडचे आहे. आईसलँड क्रिकेट असोसिएशन (Iceland Cricket Association) या बोर्डाने ट्विटर अकाऊंटवरून विराटवर निशाणा साधला. तसेच, त्याचे मागील दोन वर्षांचे आकडे दाखवून प्रश्न उपस्थित केले की, इतकी खराब आकडेवारी असूनही त्याला ड्रॉप का केले गेले नाही. यानंतर चाहत्यांनी बोर्डाला जोरदार ट्रोल केले.
आईसलँड क्रिकेटने उडवली विराटची खिल्ली
विराट कोहली याने दीर्घ काळ भारतीय संघाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच, त्याने भारतीय क्रिकेटला शिखरावर नेण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे. 2019मध्ये एकदा विराट वेगळ्याच लयीत फलंदाजी करत होता, तेव्हा असे वाटत होते की, तो क्रिकेट इतिहासातील सर्व विक्रम काही वर्षातच मोडीत काढेल. मात्र, 2019नंतर त्याचा फॉर्म असा काही बिघडला, ज्याची भारतीय क्रिकेट चाहत्यांना अजिबात अपेक्षा नव्हती.
कसोटीच्या सरासरीने खेळतोय आईसलँड क्रिकेट संघ
क्रिकेट आईसलँडने ट्विटरवर विराटचे मागील 3 वर्षांची आकडेवारी शेअर केली आहे. तसेच, विचारले आहे की, “विराट कोहलीला ड्रॉप का केले जात नाहीये?” आईसलँड क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत लिहिले की, “काही खेळाडूंना ड्रॉप केले जाऊ शकत नाही का? विराट कोहलीच घ्या, ज्याची मागील 3 वर्षांपासूनची कसोटी आकडेवारी आहे.
2020: 19.33 च्या सरासरीने 116
2021: 28.21 च्या सरासरीने 536
2022: 26.50 च्या सरासरीने 265
मागील 3 वर्षे आणि 36 डावांपासून सरासरी दर्जाचे प्रदर्शन. एवढं होऊनही तो अजून कशाच्या जीवावर संघात का संघात आहे?”
https://twitter.com/icelandcricket/status/1610027168620232704
विराटच्या चाहत्यांना केले आईसलँड बोर्डाला ट्रोल
या ट्वीटनंतर क्रिकेट चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, “तुम्ही लोक लक्ष वेधून घेत आहात… कोणाला हरकत नाही मित्रांनो ते फक्त मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी करत आहेत. त्यांना माहित आहे की, ते क्रिकेट खेळून देशाला अभिमान मिळवून देऊ शकत नाहीत.”
https://twitter.com/Asifsartaj18/status/1610170954042454018?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1610170954042454018%7Ctwgr%5E52a9b3b019802feb9c91ac46eea264261848e7b4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Funcategorized%2Ficeland-cricket-try-to-trolled-virat-kohli%2F
दुसऱ्या एकाने असे म्हटले आहे की, “हे ट्वीट डिलीट करण्याची योग्य वेळ ही पोस्ट केल्यानंतर दुसऱ्या क्षणाची होती. तसेच, दुसरी योग्य वेळ ही आता लगेच.”
https://twitter.com/ashok_apna_AK/status/1610171700569833474?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1610171700569833474%7Ctwgr%5E52a9b3b019802feb9c91ac46eea264261848e7b4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Funcategorized%2Ficeland-cricket-try-to-trolled-virat-kohli%2F
आणखी एकाने असे म्हटले की, “अरे विराट असा खेळाडू आहे, जो महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चांगला खेळतो. जसे की, 2022चा विश्वचषक. त्याला कुणाचा बापही संघाबाहेर काढू शकत नाही.”
https://twitter.com/Harsh94295/status/1610148961532416006?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1610148961532416006%7Ctwgr%5E52a9b3b019802feb9c91ac46eea264261848e7b4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Funcategorized%2Ficeland-cricket-try-to-trolled-virat-kohli%2F
https://twitter.com/ChessmenLG/status/1610105252614909952?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1610105252614909952%7Ctwgr%5E52a9b3b019802feb9c91ac46eea264261848e7b4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Funcategorized%2Ficeland-cricket-try-to-trolled-virat-kohli%2F
विराट कोहली याची विश्वचषकातील कामगिरी
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने टी20 विश्वचषक अक्षरश: गाजवला होता. त्याने यादरम्यान 6 सामन्यात फलंदाजी करताना 98.66च्या सरासरीने 296 धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने 4 अर्धशतकेही झळकावली होती. (iceland cricket try to trolled former captain virat kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्या श्रीलंकन फलंदाजांची करणार धुलाई! नेट्समध्ये खेळले एकापेक्षा एक शॉट्स
‘जावई बरा होईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ’, उर्वशीच्या आईने पंतसाठी पोस्ट शेअर करताच युजर्सच्या कमेंट्स