Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“विराट-रोहितच्या भरवश्यावर राहू नका”, भारतीय दिग्गजाने संघ व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल

January 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat Kohli & Rohit Sharma

Photo Courtesy: twitter/BCCI


सध्या क्रिकेटजगतात भारतीय संघाकडे एक मजबूत संघ म्हणून पाहिले जाते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अव्वल तीन संघांमध्ये असलेल्या भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये मात्र मागील काही वर्षांपासून सातत्याने अपयश येत आहे. 2013 चॅम्पियन ट्रॉफीपासून भारताच्या वरिष्ठ संघाने एकही आयसीसी स्पर्धा आपल्या नावे केली नाही. संघात अनेक बडे खेळाडू असतानाही भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी उंचावण्यापासून वंचित राहिला आहे. याच मुद्द्यावर आता भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी भाष्य केले आहे.

कपिल देव हे आपल्या परखड वक्तव्यांसाठी नेहमीच ओळखले जातात. याच वर्षी भारतात होत असलेल्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाला किती संधी आहे याबाबत विचारले असता, त्यांनी एकंदर परिस्थिती सर्वांसमोर ठेवली. ते म्हणाले,

“भारतीय संघ मजबूत आहे यात शंका नाही. मात्र, आपल्याला आता विराट, रोहित आणि अन्य एक दोन खेळाडूंच्या पुढे पाहावे लागेल. या अशा दोन-तीन खेळाडूंवरच पूर्ण लक्ष केंद्रित केले तर आपण जिंकण्याची शक्यता कमी आहे. संघात किमान सहा-सात खेळाडू असे हवेत, जे मॅचविनर असतील. त्यासाठी संघ व्यवस्थापनाला नक्कीच काहीतरी कठोर पावले उचलावी लागतील. आपल्याकडे असे खेळाडू आहेत, जे नक्कीच ही भूमिका पार पाडतील.”

वनडे विश्वचषक भारतातच होणार असल्याने भारताला विश्वचषक जिंकण्याची सर्वाधिक संधी असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

विराट कोहली व रोहित शर्मा हे मागील दहा वर्षापासून संघाचे नियमित सदस्य तसेच आधारस्तंभ आहेत. या दोघांनाही नेतृत्व करण्याची संधी मिळाली असून, त्यांच्या कारकीर्दीत ते एकही आयसीसी स्पर्धा जिंकू शकले नाहीत. हे दोघेही आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याने विश्वचषकासह कारकिर्दीचा समारोप करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. ‌‌

(Kapil Dev Big Statement On Virat Kohli And Rohit Sharma)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

हाच कॉन्फिडन्स हवा! मालिकेआधीच हार्दिक म्हणतोय, “स्लेजिंगची काय गरज? आम्हाला बघूनच त्यांची…”
बाबर-रिझवानची पाकिस्तान संघातून होणार हकालपट्टी? आफ्रिदीने सुरू केली तयारी


Next Post
Jasprit-Bumrah

BREAKING: चार महिन्यांनी बूम बूम बुमराहचे कमबॅक; श्रीलंकेविरुद्ध उतरणार मैदानात

IPL-Trophy-Ganguly-Rohit

आता आयपीएलमध्ये दिसणार 'दादा'गिरी! 'या' संघाचे मार्गदर्शक बनले सौरव गांगुली

Rishabh-Pant-And-Urvashi-Rautela

'जावई बरा होईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ', उर्वशीच्या आईने पंतसाठी पोस्ट शेअर करताच युजर्सच्या कमेंट्स

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143