भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या मालिकेला मंगळवारी (3 जानेवारी) सुरुवात होईल. भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हार्दिकने स्लेजिंगविषयी आपले मत व्यक्त केले.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी हार्दिकने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या मालिकेत आशिया चषकातील पराभवाचा बदला घेणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला,
“आम्ही कोणताही बदला घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार नाही. हा एक क्रिकेट सामनाच असेल ज्यामध्ये चांगले क्रिकेट खेळण्याचा आमचा प्रयत्न राहील. आम्ही त्यांना स्लेजही करणार नाही. आमच्या देहबोलीवरूनच त्यांना समजायला हवे की, ते भारताशी खेळत आहेत. आशिया चषकात ज्या खेळाडूंनी आम्हाला दबाव टाकले त्या खेळाडूंवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न असेल.”
भारताला आशिया चषकात श्रीलंकेकडून सुपर फोर फेरीच्या सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे संघाला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नव्हता.
हार्दिक याला टी20 संघाचा नियमित कर्णधार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच याबाबतची घोषणा देखील होऊ शकते. तत्पूर्वी, त्याला कर्णधार म्हणून पुरेसा अनुभव देण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. यापूर्वी देखील त्याला आयर्लंड व न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी कर्णधार म्हणून संधी दिली गेलेली. या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरलेला.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.
(We Are Not Sledge Them Hardik Pandya Clarify Before T20 Series Against Srilanka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्टिना नवरातिलोवाला दुसऱ्यांदा झाला कॅन्सर, महान टेनिसपटूनवर यावेळी डबल अटॅक
विराटचे अतिक्रिकेट खेळणे चिंताजनक”, श्रीलंकन दिग्गजाने ओळखली भविष्याची चाहूल