Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘गावसकर-तेंडुलकरांना जवळून पाहिलं, पण सूर्याचा विषयच वेगळा…’, माजी प्रशिक्षकांचा दावा

'गावसकर-तेंडुलकरांना जवळून पाहिलं, पण सूर्याचा विषयच वेगळा...', माजी प्रशिक्षकांचा दावा

January 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Suryakumar-Yadav

Photo Courtesy : Twitter/ICC


मुंबईतून भारतीय संघाला आजपर्यंत अनेक दिग्गज फलंदाज मिळाले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा 10,000 धावा करणारे सुनील गावसकर असो किंवा 100 शतकांचा मानकरी सचिन तेंडुलकर. हे सर्वच खेळाडू मुंबई शकरातून आले आहेत. सध्या भारताचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमार यादव देखील मुंबईकर आहे. अशातच मुंबईच्या 22 वर्षांखालील संघाचे माजी प्रशिक्षक विलास गोडबोले यांनी सूर्यकुमारची तुलाना सचिन आणि गावसकरांसारख्या दिग्गजांशी केली आहे.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) भारतीय संघासाठी खेळण्याआधी मुंबई संघाचा महत्वाचा खेळाडू राहिला आहे. 10 वर्षांपूर्वी मुंबई अंडर 22 संघाला प्रशिक्षण देणाऱ्या विलास गोडबोले (Vilas Godbole) यांनी सूर्यकुमारची गुणवत्ता तेव्हाच पारखली होती. त्यांनी सुर्यकुमारला सांगितले होते की, तो एक दिवस नक्कीच भारतीय संघासाठी खेळेल. गोडबोलेंचे हे शब्द आज खरे ठरले असून भारतीय संघाचा तो एक महत्वाचा खेळाडू ठरला आहे.

माध्यमांशी बोलताना विलास गोडबोले म्हणाले की, “सूर्यकुमार तेव्हाही खूप प्रतिभाशाली होता. त्याने भारतासाठी थोडं लवकर पदार्पण करायलं हवं होते, अस आपण आता म्हणू शकतो. त्याने ज्या पद्धतीने पुनरागमन केले, ते कामल आहे. मी त्याला मीडियम पेसर गोलंदाजावर रिवर्स स्वीप खेळताना पाहिले आहे. मी सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांना खूप जवळून पाहिले आहे. पण सूर्यकुमारसारखा कोणीच नव्हता. सूर्यकुमार यादव ज्या आत्मविश्वासासह खेळतो, ते पाहून मला विजय मांजरेकरांची आठवण येते. त्याला माहिती असते की गोलंदाज चेंडू कुठे टाकणार आहे. ही एक महान फलंदाजाचे लक्षण आहे. गावसकर आणि तेंडुलकरांकडे हे कौशल्य होते. हेच कौशल्य सूर्यकुमारकडेही दिसत आहे. सूर्यकुमार अधिक घातक आहे, कारण तो मागच्या दिशेने देखील खेळू शकतो.”

दरम्यान, सूर्यकुमार यादवने नुकतीच रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे कर्णधारपद सांभाळले. आता तो भारतीय संघासोबत मंगळवारी (3 जानेवारी) श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामना खेळणार आहे. उभय संघांतील टी-20 मालिकेचा हा पहिला सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियवर खेळला जाणार आहे. सूर्याने सरत्या वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने मागच्या वर्षात एकूण 1164 धावा केल्या आणि यादीत पहिल्या क्रमांकावर राहिला. (‘Watched Gavaskar and Tendulkar closely, but Surya is more aggressive’, claims former coach)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हाच कॉन्फिडन्स हवा! मालिकेआधीच हार्दिक म्हणतोय, “स्लेजिंगची काय गरज? आम्हाला बघूनच त्यांची…”
कुलदीपचे कौतुक केल्यामुळे दिनेश कार्तिक अडचणीत, प्रशिक्षकांनीच केले आरसा दाखवण्याचे काम


Next Post
Team-India

आता थांबायचं नाय! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 'हा' पठ्ठ्या करणार पदार्पण? ईशान असेल बॅकअप

Virat Kohli & Rohit Sharma

"विराट-रोहितच्या भरवश्यावर राहू नका", भारतीय दिग्गजाने संघ व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल

Jasprit-Bumrah

BREAKING: चार महिन्यांनी बूम बूम बुमराहचे कमबॅक; श्रीलंकेविरुद्ध उतरणार मैदानात

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143