भारताच्या दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या राहुल द्रविडवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच वेळ झाला आहे, परंतु त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. या यादीत बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिचाही समावेश आहे. चढ्ढा हिने राहुल द्रविडला तिचे पहिले प्रेम असे म्हटले आहे.
चड्ढा यांनी देखील कबूल केले की ती आता नियमितपणे क्रिकेट पाहत नाही, परंतु अधूनमधून फक्त द्रविडला पाहण्यासाठी तिच्या भावासोबत सामने पाहायची. द्रविडने २०१२ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने शेवटचा वनडे सामना २०११ मध्ये खेळला होता.
रिचा चढ्ढा म्हणाली की, जेव्हा द्रविड निवृत्त झाला, तेव्हा तिने क्रिकेट पाहणे बंद केले होते. तिने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की ‘मी लहानपणी क्रिकेटची फारशी चाहती नव्हते. हो, माझा भाऊ क्रिकेट खेळायचा. एक वेळ होती, जेव्हा मी क्रिकेट सामने टीव्हीवर पाहायची, मला राहुल द्रविडला खेळताना पाहायला आवडायचे. जेव्हा तो संघातून बाहेर गेला, त्यानंतर मी क्रिकेट पाहाणे बंद केले. माझे पहिले प्रेम राहुल द्रविड आहे.’
आता राहुल द्रविडला भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षकपद सोडलेल्या रवी शास्त्रीच्या जागी त्यानी पदभार स्वीकारला. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने अलीकडेच टी२० मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला.
राहुल द्रविडने आपल्या कारकिर्दीत १६४ कसोटी आणि ३४४ एकदिवसीय सामने खेळले. त्याने दोन्ही प्रकारांमध्ये प्रत्येकी १० हजारांहून अधिक धावा केल्या. त्याच्या नावावर कसोटीत १३२८८ धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०८८९ धावा आहेत. याशिवाय त्याने १ टी२० आंतरराष्ट्रीय देखील खेळला आहे, ज्यात त्याने ३१ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या २३ हजारांहून अधिक धावा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी तो षटकार आयुष्यभर लक्षात ठेवेन’, तमिळनाडूला विजेता बनवणाऱ्या ‘फिनिशर’ शाहरुखची मोठी प्रतिक्रिया
‘जादूगार’ श्रेयस अय्यरने दाखवलेली पत्त्यांची जादू पाहून मोहम्मद सिराज थक्क, पाहा व्हिडिओ
भारत-पाकिस्तानमध्ये होणार द्विपक्षीय मालिका? ‘या’ ठिकाणी होऊ शकते आयोजन