सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट बंद पडले आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही इतर खेेळाडूंप्रमाणे इंस्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्याने आपल्या आवडत्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.
एका चाहत्याने यादरम्यान अर्जुनला (Arjun Tendulkar) प्रश्न विचारला की, तुझा आवडता अष्टपैलू क्रिकेटपटू (Most Favourite All Rounder Cricketer) कोण आहे? या प्रश्नाचे उत्तरे देत अर्जुनने इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सचे (Ben Stokes) नाव घेतले.
सर्वांना असे वाटत होते की अर्जुनचा आवडता अष्टपैलू क्रिकेटपटू हा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आहे. परंतु तो खेळाडू बेन स्टोक्स आहे. अर्जुन स्वत:ही अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. तसेच तोही डाव्या हातानेच फलंदाजी करतो तर डाव्या हाताने गोलंदाजी करतो. तर बेन स्टोक्सही उजव्या हाताने गोलंदाजी करतो.
स्टोक्सला सध्याच्या काळात जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हटले तर चूकीचे ठरणार नाही. स्टोक्समध्ये आपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने सामना जिंकण्याची ताकद आहे. स्टोक्सने २०१९ विश्वचषक, ऍशेस मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चमकदार कामगिरी करत इंग्लंडच्या विजयात मोलाचे योगदान केले होते.
स्टोक्सने २०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाबाद ८४ धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर त्याने ऍशेसच्या तिसऱ्या कसोटीत १३५ धावा करत इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. या मालिकेत २-२ बरोबरी झाली होती. त्यामुळे स्टोक्सला बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द ईअर म्हणून निवडण्यात आले होते.
याव्यतिरिक्त आयसीसीने त्याची वर्षातील जागतिक खेळाडू म्हणून निवड केली होती. तसेच विस्डेननेही त्याला २०१९मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले. अशाप्रकारे स्टोक्सने ३ वर्षांपासून हा पुरस्कार पटकाविणाऱ्या विराटला मागे टाकले.
स्टोक्सने ६३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३६.५४च्या सरासरीने ४०५६ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १४७ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने ९५ वनडे सामन्यांमध्ये ४०.६३ च्या सरासरीने २६८२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १२ आंतरराष्ट्रीय शतके आहेत. यामुळेच अर्जुन तेंडुलकरसोबत लाखो युवा चाहते स्टोक्सला आपला आवडता खेळाडू मानतात.
अर्जुनने भारताच्या १९ वर्षाखालील संघात स्थान मिळविले आहे. परंतु त्याला विश्वचषकात संघामध्ये स्थान मिळवता आले नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-३ असे रणजी विक्रम, जे केवळ आहेत वसिम जाफरच्या नावावर
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
-३ असे रणजी विक्रम, जे केवळ आहेत वसिम जाफरच्या नावावर