पाकिस्तान संघाचे माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन रजा नकवी यांना जोरदार सुनावले आहे. अकमल यांनी हे देखील म्हटले आहे की, जर पाकिस्तान संघ पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांचे खेळातील प्रदर्शन सुधारू शकला नाही तर, नकवी यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला पाहिजे. पाकिस्तान संघाने टी20 मालिकेनंतर न्युझीलंड विरुद्ध वनडे मालिकादेखील गमावलेली आहे.
त्यांचा यूट्यूब चैनल वर कामरान अकमल यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन यांच्यावर टीका करत म्हटले की, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या चेअरमन यांना विचार करायला हवा, जर ते बिघडलेल्या गोष्टींना नियंत्रित करू शकत नाहीत तर त्यांनी राजीनामा देणच योग्य आहे. तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेवर डाग जर लावून घेऊ शकत नाही तर, जर तुम्हाला राजीनामा द्यायचा नाही तर तुम्ही संघाची अवस्था सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
पाकिस्तान संघाचा न्यूझीलंड दौरा 16 मार्च पासून सुरू झाला होता. पहिल्यांदा दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यात आली. पूर्ण मालिकेत पाकिस्तान संघ फक्त एकच सामना जिंकू शकला, शेवटी त्यांना 1-4 पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली, ज्यामध्ये यजमान न्यूझीलंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानचं लाजिरवाणं प्रदर्शन खूप वेळापासून चालू आहे. बाबर आजम, मोहम्मद रिजवान आणि शाहीन आफ्रिदी यांसारखे मोठे खेळाडू देखील खेळातील खराब प्रदर्शनामुळे निरंतर टिकेच्या घेऱ्यात अडकले आहेत. स्पर्धेमध्ये यजमान असूनही पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ग्रुप स्टेज पासून पुढे जाऊ शकला नाही. इतकचं नाही तर, संपूर्ण स्पर्धेत त्यांना एकही विजय मिळवता आला नाही.