---Advertisement---

विराट कोहली म्हणतो,’…तर खेळाडूंनी ब्रेक घ्यावा’

---Advertisement---

न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापुर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दौऱ्याच्या वेळापत्रकावर प्रश्न उभे केले होते. त्यानंतर आता काल (2 मार्च) भारताचा न्यूझीलंड दौरा समाप्त झाला. यावेळी भारताने न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका (T20 Series), 3 सामन्यांची वनडे (ODI Series) आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळली.

मात्र, भारताला यापैकी केवळ टी20 मालिका 5-0ने जिंकण्यात यश आले आणि उर्वरित वनडे 0-3ने आणि कसोटी मालिका 0-2ने गमवावी लागली. यानंतर विराटने भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल भाष्य केले.

काल हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 7 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यानंतर विराटला पत्रकार परिषदेत भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी विराटने सांगितले की, “जसे मी यापुर्वीही सांगितले होते, मला नाही वाटत की येणाऱ्या 2-3 वर्षात मला कोणताही त्रास सहन करावा लागेल. जर खेळाडूंना वाटत असेल की त्यांना अधिक क्रिकेट खेळावे लागत आहे. तर त्यांनी क्रिकेटच्या स्वरूपानुसार त्यांचे प्राधान्य ठरवावे आणि त्यानुसार ब्रेक घ्यावा. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.”

31 वर्षीय विराट म्हणाला की, “भारतीय संघाचा ऑफ सीझन खूप लांब असेल तर ते तोट्याचे ठरेल. म्हणून मिळालेल्या वेळेत ब्रेक घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. कारण, भविष्यातील वेळापत्रक (फ्यूचर टूर प्रोग्राम) हे अगोदरच तयार करून ठेवण्यात आले आहे. आपल्याला परिस्थितीनुसार ताळमेळ साधावा लागेल. यासाठी ब्रेक घेणे खूप गरजेचे आहे. जर एखादा गोलंदाज सामन्यादरम्यान जखमी झाला तर त्या परिस्थितीलाही सांभाळून घ्यावे लागते.”

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीच्या गोलंदाजीला रॉस टेलरने केले ट्रोल, पहा काय म्हणाला-

टीम इंडियाचा टी२० वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये या संघाविरुद्ध होणार सामना

या तीन मोठ्या खेळाडूंचे होऊ शकते टीम इंडियात पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---