महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना गुरुवारी (29 जून) आयोजित केला गेला. रत्नागिरी जेट्स आणि कोल्हापूर टस्कर्स संघ एमपीएलच्या अंतिम सामन्यात आमने सामने आहेत. मात्र, सर्वांना ज्याची भीती होती तेच घडले. ऐन सामन्याच्या वेळी एमपीएस स्टेडियमवर पावसाने हजेरी लावली. सामना पावसामुळे गुरुवारी होऊ शकला नाही तर काय? असा प्रश्न चाहत्यांना अपडला आहे. चला तर जाणून घेऊ एमपीएलच्या नियमावलीविषयी.
रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) आणि कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) संघातील हा एमपीएलचा अंतिम सामना गुरुवारी सायंकाली 7.30 वाजात सुरू होणार होता. मात्र, त्याआधीच मैदानात मुसळधार पावसाने हजेरी लावली. चाहत्यांनी देखील पावसामुळे स्टॅन्डमधून पळ काढला. पावसामुळे अंतिम सामन्यात व्यत्यय येऊ शकतो, याची कल्पना आयोजिक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएसनला आधीच होती. याच पार्श्वभूमीवर एमसीएकडून प्लेऑफच्या चार सामन्यांसाठी खास नियमावली बनवली गेली होती.
या चारही सामन्यांवर पावसाचे सावट असल्यामुळे प्रत्येक सामन्यासाठी अधिकचे दोन तास राखीव ठेवले गेले आहेत. यामुळे उशीर झाला तरीही सामना संपूर्ण 20 षटकांचा होऊ शकतो. तरीदेखील सामन्यातील षटकांमध्ये कपात करण्याची वेळ आली, तर प्रत्येक 4.25 मिनिटांसाठी एक षटक कमी खेलवले जाणार. सामना किमान पाच षटकांचा व्हावा असा प्रयत्न असेल. पाच षटकांचाही सामना होऊ शकला नाही, तर सुपर ओव्हरच्या आधारे सामन्याचा निकाल समोर येऊ शकतो.
पावसामुळे सुपर ओव्हर देखील खेलवता आली नाही, तर मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी हा सामना खेळवला जाईल. राखीव वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन अशी आहे. एकदा सुरू होऊन पावसामुळे सामना रद्द झाला, तर दुसऱ्या दिवशी तिथूनच खेळ सुरू होईल, जिथे खेळ थांबला होता. सलग दोन दिवस सामना खेळवताच आला नाही, तर आयोजकांना गुणतालिकेच्या आधारे विजेतेपदाची घोषणा करावी लागले. सध्या रत्नागिरी जेट्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे त्यांचा संघ पावसाच्या व्यत्यामुळे ट्रॉफी उंचावू शकतो. (If rain interrupts MPL final, which team will win the trophy?)
महत्वाच्या बातम्या –
वय फक्त आकडा! 36व्या वर्षी झिम्बाब्वेचा पठ्ठ्या बनला गोलंदाजांचा काळ, शतक ठोकत गिलची केली बरोबरी
FIFA Rankings : टीम इंडियाने उंचावली 140 कोटी भारतीयांची मान, पाच वर्षात पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा