RCB Fan Request To Karnataka CM: आयपीएल 2025चा आयपीएल हंगाम (IPL Season 18) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दरम्यान पहिला क्वालिफायर सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आरसीबीच्या चाहत्यांच्या आशा वाढल्या आहेत. यंदा ट्राॅफी जिंकून बंगळूरुचा संघ पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी पटकावू शकेल, असे कयास लावले जात आहेत. संघाच्या संभाव्य विजयाबाबत एका आरसीबी चाहत्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दारमैया (Karnataka CM Siddaramaiah) यांच्याकडे खास अपील केली आहे. (RCB Fan Appeal)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाच्या एका चाहत्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दारमैया यांच्यासाठी एक खास निवेदन लिहिले आहे. हे निवेदन कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात असलेल्या गोकाक शहरातील एका रहिवाशाने लिहिले आहे. या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांकडे अशी विनंती केली आहे की, जर बंगळूरु संघाने यावर्षी आयपीएल 2025 ची ट्रॉफी जिंकली, तर ‘आरसीबी फॅन्स फेस्टिव्हल डे’ (RCB Fans Festival Day) म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. या चाहत्याचे म्हणणे आहे की, आरसीबीच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी लोकांना एक दिवसाची सुट्टी मिळायला हवी. (Public Holiday RCB Win) आरसीबी चाहत्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
An RCB fan from Gokak has written to CM @siddaramaiah with a bold request to declare the day RCB wins the IPL as "RCB Fans Festival Day" & make it a public holiday! Viral letter asks for statewide celebrations like Karnataka Rajyotsava. #RCB #IPLFinals pic.twitter.com/kYoOw95Dff
— Sagay Raj P || ಸಗಾಯ್ ರಾಜ್ ಪಿ (@sagayrajp) May 30, 2025
आरसीबी संघाने पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जला 8 विकेट्सने धूळ चारली. या विजयासह आरसीबीचा संघ आयपीएल 2025च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर पंजाब किंग्ज संघाला अजूनही फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी एक संधी आहे. आज, शुक्रवार (30 मे) रोजी, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला जाईल. आजचा सामना जो संघ जिंकेल, तो दुसऱ्या प्लेऑफ क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जसोबत खेळेल. क्वालिफायर-2 जिंकणारा संघ आरसीबी संघासोबत फायनल सामना (3 जून) रोजी खेळेल. (IPL 2025 Final)