---Advertisement---

Ranji Trophy 2024 । हैदराबाद संघाची चांदी! प्रत्येक खेळाडूला मिळणार BMW कार

Hyderabad Cricket Association
---Advertisement---

रणजी ट्रॉफी 2024 मध्ये हैदराबाद संघ प्लेट ग्रुममध्ये खेळला. प्लेट ग्रुपच्या अंतिम सामन्यात हैदराबादकडून मेघालया संघाचा 5 विकेट्सने पराभव झाला. अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात 122 धावांची खेळी करणाऱ्या नितेश रेड्डी याने सामनावीर पुरस्कार जिंकला. या विजयानंतर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडून खेळाडूंना बक्षीसांची वाटप झाले. सोबत बोर्डाचे अध्यक्ष जगन मोहन राव अर्सिहनपल्ली यांनी खेळाडूंनी आगामी हंगामात चांगले प्रदर्शन करावे, यासाठी मोठ्या आशा दाखवल्या आहेत.

रणजी ट्रॉफी 2024 (Ranji Trophy 2024) मध्ये हैरदाबाद संघाने प्लेट ग्रुममध्ये सर्वोत्तम प्रदर्शन केले. आगामी रणजी हंगामात हैदराबाद संघ एलिट ग्रुपचा भाग असेल. यावर्षी प्लेट ग्रुपच्या अंतिम सामन्यात मेघालय संघाचा मात दिल्यानंतर हैदराबाद क्रिकेट बोर्डाकडून (Hyderabad Cricket Association) आपल्या संघाला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. क्रिकेट बोर्ड एवढ्यावर न थांबता त्यांनी पुढे मोठी घोषणा केली.

हैदराबाद क्रिकेट बोर्डाकडून असे सांगितले गेले आहे की, जर त्यांच्या संघाने पुढच्या तीन वर्षात रणजी ट्रॉफी जिंकली, तर प्रत्येक खेळाडूला BMW गाडी भेट दिली जाईल. सोबतच संघाला बक्षीस रुपात एक कोटी रुपये दिले जातील. एचसीएचे अध्यक्ष जगण मोहन राव अर्शिनपल्ली इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले, “खेळाडू आणि इतर भागधारकांना प्रेरित करण्यासाठी आम्ही ही घोषणा केली आहे. पुढच्या वर्ष हे लक्ष्य गाठता येईल, असे वाटत नाही. पण मी त्यांना यासाठी पुढचे तीन वर्ष वेळ देतो.”

हैदराबाद क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी ही घोषणा केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अशात आगामी तीन रणजी हंगामांमध्ये हैदराबाद संघ विजेतेपदापर्यंत मजल मारू शकतो की नाही, हे पाहण्यासारखे असेल. हैदराबादने रणजी ट्रॉफी जिंकली, तर नक्कीच संघातील सर्व खेळाडूंची चांदी झाली, असे आपण म्हणू शकतो. (If the Hyderabad team wins the Ranji Trophy in the next three years, everyone in the team will get a BMW car)

महत्वाच्या बातम्या – 
यशस्वी जयस्वालला द्विशतकांमुळे कसोटी क्रमवारीत झाला बंपर फायदा, केला आतापर्यंतचा मोठा रेकॉर्ड
Ajinkya Rahane । अजिंक्य रहाणेच्या घरी ‘नू फॅमिली मेंबर’, कसोटी स्पेशलिस्टने केला तीन कोटींचा खर्च

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---