कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वाढला आणि आयपीएल २०२० व टी२० विश्वचषकाचे आयोजन झाले नाही, तर काही क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते.
या क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि पाकिस्तानचा फलंदाज शोएब मलिक यांचाही समावेश आहे.
अशाच प्रकारे या लेखात आपण ५ क्रिकेटपटू पाहणार आहोत. ज्यांची कारकीर्द कोरोना व्हायरसमुळे धोक्यात येऊ शकते.
कोरोना व्हायरसमुळे या ५ क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते- This 5 Cricketers International career will be in danger due to Corona Virus
१. एमएस धोनी-
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) कारकीर्दीवर सर्वाधिक चर्चा केली जात आहे. धोनीने आपला शेवटचा सामना जुलै २०१९मध्ये विश्वचषकातील उपांत्य सामन्यात खेळला होता. त्यानंतर तो आतापर्यंत एकही सामन्यात खेळताना दिसलेला नाही. परंतु त्याने टी२० विश्वचषकात (T20 World Cup) खेळण्याची इच्छा दाखविली होती. त्यासाठी तो आयपीएलसाठी मेहनत घेत होता. जर आयपीएल (IPL) रद्द झाले तर धोनी जवळपास १वर्ष क्रिकेटपासून दूर राहील.
धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या भारताच्या वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून भारताकडे केएल राहुल (KL Rahul) हा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे जुलै महिन्यात ३९ वर्ष पूर्ण करणाऱ्या धोनीचे पुनरागमन धोक्यात येऊ शकते.
कदाचित जर धोनीच्या निवृत्तीपूर्वी बीसीसीआयने (BCCI) संधी दिली तर धोनी टी२० विश्वचषकात खेळू शकतो. परंतु गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि इतर माजी खेळाडूंनी धोनीच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.
२. शोएब मलिक-
पाकिस्तानचा सध्याचा सर्वात अनुभवी क्रिकेटपटू म्हणून शोएब मलिककडे (Shoaib Malik) पाहिले जाते. १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या शोएबला पुढील टी२० विश्वचषकात खेळायचे आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) त्याचे हे स्वप्न स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये अनेकजण शोएबला निवृत्ती घेण्याचा सल्ला देत आहे. सल्ला देणाऱ्यांंमध्ये पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांचा समावेश आहे.
शोएबची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द जवळपास २० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्याच्या नावावर पाकिस्तानकडून सर्वाधिक काळ खेळण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे यावर संकट आले आहे. जर टी२० विश्वचषकाचे आयोजन झाले नाही, तर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते.
३. ख्रिस गेल-
वेस्ट इंडीज संंघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्याने मागील वर्षीच विश्वचषक हा आपला शेवटचा टप्पा असल्याचे सांगितले होते. विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने आपली निवृत्तीचा न घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तो म्हणाला होता की, निवृत्ती तर घेतलीच नाही. तरीही ऑगस्ट २०१९पासून त्याला संघात स्थान देखील मिळाले नाही.
असे असले तरीही त्याचे लक्ष टी२० विश्वचषक आहे. त्याला विश्वचषकात संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु सध्यातर सर्वच सामने स्थगित किंवा रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याची टी२० विश्वचषकात खेळण्याची शक्यता कमी आहे. जर टी२० विश्वचषक झाला नाही, तर त्याला पुढील आंतरराष्ट्रीय सामना खेळल्याशिवाय निवृत्ती घ्यावी लागू शकते.
४. लसिथ मलिंगा-
श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना याचवर्षी मार्चमध्ये खेळला होता. मलिंगा आयपीएल आणि टी२० विश्वचषकात खेळण्याची दाट शक्यता होती. परंतु आता आयपीएलही नाही आणि टी२० विश्वचषकही होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ३६ वर्षीय मलिंगाची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही धोक्यात आली आहे.
मलिंगा आपल्या कारकीर्दीत अनेक वेळा दुखापतींना सामोरे गेला आहे. त्यामुळे त्याला क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु तरीही तरीही श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मलिंगाला संघात स्थान दिलेले आहे. त्यामुळे श्रीलंका संघाला वाटते की त्यांच्याकडे अनुभवी गोलंदाज असायला पाहिजे.
५. एबी डिविलियर्स-
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सचा (AB De Villiers) किस्सा थोडा वेगळा आहे. डिविलियर्सने २ वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. तो श्रीलंकेविरुद्ध सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. तसेच तो टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार होता. परंतु तो पुनरागमन करणार त्याचवेळी सर्व क्रीडा स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आल्या. त्यामुळे आता त्याचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन लांबणीवर जाऊ शकते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-गौतम गंभीर म्हणतो, धोनी नकोच; या खेळाडूला द्या टी२० विश्वचषकात संधी
-१९ वर्षांपेक्षा जास्त काळ वनडे क्रिकेट खेळणारे ५ क्रिकेटपटू
-धोनीसह भारतीय संघाकडून खेळलेले झारखंडचे ३ खेळाडू