आरसीबीने (RCB) क्वालिफायर एक मध्ये पंजाब किंग्सचा (Punjab kings) पराभव करून अंतिम सामन्यात त्यांचे स्थान पक्के केले. आता प्रतीक्षा आहे ती दुसऱ्या फायनलिस्ट संघाची. ज्याचा निर्णय 1 जूनला होईल. कारण या दिवशी पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे (punjab kings vs mumbai indians). वेळापत्रकानुसार आयपीएल 2025 (IPL 2025) चा अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
मुख्य वेळापत्रकानुसार आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे. जर पाऊस किंवा अन्य कोणत्याही कारणाने सामना रद्द झाला तर, सामना 4 जून रोजी खेळला जाईल. याचे कारण असे की, नियमांनुसार 4 जूनला अंतिम सामन्याचा राखीव दिवस ठरवण्यात आले आहे.
काही वेळापूर्वीच प्लेऑफच्या सामन्यांचे नवे नियम लागू केले आहेत. जर कोणत्याही कारणाने प्लेऑफ सामने पाऊस किंवा अन्य कोणत्या कारणाने योग्य वेळेत सुरू झाले नाहीत, तर त्यासाठी 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. याचा अर्थ असा की, जर सामना 7.30 वाजता सुरू होऊ शकला नाही तर रात्री 9.30 वाजेपर्यंत षटकांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. म्हणजेच जर 9.30 वाजता सामना सुरू झाला तरीसुद्धा पूर्ण 20 षटकांचा सामना खेळवला जाईल.
सध्या आयपीएल 2025 स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर आहे. तीन मधील दोन संघ असे आहेत, त्यांनी कधीच ट्रॉफी जिंकली नाही. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आतापर्यंत पाच वेळा चॅम्पियन ट्रॉफी उचलली आहे. मुंबई सुद्धा चार वर्षांपासून त्यांच्या 6व्या प्रतीक्षेत आहे. मुंबईने त्यांची शेवटची ट्रॉफी 2020 मध्ये जिंकली होती. तेव्हा त्यांनी दिल्ली कॅपिटलचा (delhi capitals) 5 विकेटने पराभव केला होता. मुंबई मागच्या चार हंगामांपासून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकली नाही.




