राजस्थान रॉयल्सला पहिल्या क्वालिफायर सामन्यात मात दिल्यानंतर गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. फिरकी गोलंदाज राशिद खानने या सामन्यात चांगले प्रदर्शन केले. त्याने टाकेलल्या ४ षटकात एकही विकेट घेऊ शकला नाही, पण यादरम्यान फक्त १५ धावा खर्च केल्या. अंतिम सामन्याच्या आधी गुजरातच्या संघाला चार दिवसांचा मोकळा वेळ मिळाला आहे. आता या मोकळ्या वेळेत काय करायचे? याचे उत्तर राशिद खानने दिले आहे.
गुजरातच्या विजयात डेविड मिलरचे योगदान महत्वाचे राहिले. त्याने शेवटच्या षटकात लागोपाठ तीन षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. मिलरने ३८ चेंडूत ६८ धावा केल्या आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला. कर्णधार हार्दिक पंड्याने देखील नाबाद ४० धावांचे योगदान दिले, जे विजयासाठी महत्वाचे ठरले. अंतिम सामन्याच्या आधी मिळालेल्या चार दिवसांबाबतीत गुजरात टायटन्सच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक खास ट्वीट केले गेले, ज्यावर राशिद खान (Rashid Khan) देखील व्यक्त झाला आहे.
गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर ट्वीट केले की, “आता चार दिवस सुट्टी आहे, काय करायचे ?” यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. पण सर्वाचे लक्ष वेधले ते राशिद खानच्या रिप्लायने.
Abhi chaar din chutti hai. Kya kare? 😉#LateNightThoughts
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 24, 2022
ट्वीटवर रिप्लाय करताना राशिद म्हणाला की, “झोपी जावा.” राशिदने या ट्वीच्या माध्यमातून एकप्रकारे संघाचे पुढच्या चार दिवसांती नियोजन काय असणार आहे, ज्याचे संकेत दिले आहेत. आयपीएल हंगाम सुर झाल्यापासून सतत चांगले प्रदर्शन केल्यानंतर खेळाडू नक्कीच थकले आहेत, ज्यांना या चार दिवसांमध्ये आरामाची संधी मिळेल.
Sooooo Jaooo 😂😂😂
— Rashid Khan (@rashidkhan_19) May 24, 2022
राशिदने चालू आयपीएल हंगामात केलेल्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत १८ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ६.७३ होता. मागच्या वर्षीपर्यंत राशिद सनरायझर्स हैदराबादसाठी खेळत होता, पण यावर्षी मेगा लिलावाच्या आधी गुजरात टायटन्सने त्याला संघात सामील केले.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सला क्वालिफायर १ सामन्यात जरी गुजरातने मात दिली असली, तरी अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे अजून एक संधी आहे. क्वालिफायर २ सामन्यात राजस्थान आणि एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ आमने- सामने असतील. एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात बुधवारी (२५ मे) खेळला जाईल. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास इथेच संपेल, तर विजयी संघ क्वालिफायर २ मध्ये राजस्थानशी भिडेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धवनला भारताच्या टी२० संघातून वगळण्यामागे राहुल द्रविड आहे कारण? वाचा सविस्तर
‘त्यांच्यामुळेच मी चांगला क्रिकेटर बनू शकलो’, हार्दिकने यशाचे श्रेय दिले ‘या’ तिघांना
“दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है”, मिलरच्या ट्वीटला राजस्थानचा भन्नाट रिप्लाय