मुंबई। रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ६७ व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला ८ विकेट्सने मात दिली. हा सामना गुरुवारी (१९ मे) वानखेडे स्टेडियनवर झाला. या सामन्यात विजय मिळवला असल्याने बेंगलोरच्या आयपीएल २०२२ च्या प्लेऑफसाठीच्या आशाही जिवंत राहिल्या आहेत. पण, त्यांच्यासाठी प्लेऑफची गणिते २१ मे रोजी होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यावर बरीच अवलंबून आहेत. त्याचमुळे बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने रोहित शर्मा याला खास संदेश दिला आहे.
बेंगलोरचे भविष्य मुंबईच्या हातात
बेंगलोरने गुजरातला (Gujarat Titans vs Royal Challengers Bangalor) पराभूत केल्यानंतर गुणतालिकेत १६ गुणांसह चौथा क्रमांक मिळवला आहे. सध्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचे देखील १६ गुण आहेत. पण राजस्थानपेक्षा नेटरनरेट बेंगलोरचा कमी असल्याने राजस्थान तिसऱ्या आणि बेंगलोर चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे आता या दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने मुंबईने दिल्लीला पराभूत करणे महत्त्वाचे आहे.
पण, त्यातही राजस्थानसाठी प्लेऑफची सुत्रे स्वत:च्या हातात आहेत. कारण त्यांचा शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सनविरुद्ध सामना होणार आहे. त्यात त्यांनी विजय मिळवला, तर ते थेट प्लेऑफसाठी पात्र ठरतील. पण पराभूत झाले, तर त्यांना बेंगलोरप्रमाणे दिल्ली-मुंबई सामन्यावर लक्ष ठेवावे लागेल. त्यांच्यासाठी जमेची बाजू एकच आहे की, त्यांचा नेटरनरेट चांगला आहे. त्यामुळे जरी दिल्ली मुंबई इंडियन्सविरुद्ध जिंकली, तरी ते प्लेऑफसाठी नेट रनरेटरेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.
पण, जर दिल्ली मुंबईविरुद्ध पराभूत झाले, तर त्यांचे १४ गुणच राहतील. त्यामुळे बेंगलोरला थेट प्लेऑफची दारं उघडी होतील. पण, जर मुंबईविरुद्ध दिल्ली जिंकले, तर मात्र दिल्लीचे देखील १६ गुण होतील. त्यामुळे मग प्लेऑफच्या प्रवेशाची गणिते नेटरनरेटवर अवलंबून असतील. सध्या तरी दिल्लीचा नेटरनरेट बेंगलोरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बेंगलोरची हीच इच्छा असेल की, मुंबईने दिल्लीला पराभूत करावे.
रोहितला आमचा पाठिंबा – फाफ डू प्लेसिस
प्लेऑफची समीकरणे (IPL 2022 Playoffs) लक्षात घेता फाफ डू प्लेसिसने (Faf du Plessis) मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) दिल्ली विरुद्धच्या सामन्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. गुरुवारच्या सामन्यानंतर फाफ म्हणाला, ‘आजची रात्र आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. तुम्हाला स्पर्धेचा शेवट मजबूतीने करून दाखवायचे असते की, तुमच्या ड्रेसिंगरुममध्ये किती क्षमतेचे खेळाडू आहेत. माझ्यासाठी हे महत्त्वाचे होते की, एक संघ म्हणून आम्ही खेळलो आणि नियंत्रण आमच्या हातात होते.’
फाफ पुढे म्हणाला, ‘कदाचित एक किंवा दोन अस्थिर कामगिरीने आम्ही आज या स्थितीत आहोत. परंतु, आजची रात्र आमच्यासाठी खरोखरच महत्त्वाची होती. पुढच्या दोन दिवसांसाठी आमच्या ड्रेसिंग रुममध्ये काही निळ्या टोप्या आहेत आणि आम्ही आता रोहितवर आशा बाळगतो की, तो मोठा विजय मिळवेल.’
बेंगलोरच्या या विजयात विराट कोहलीनेही मोठे योगदान दिले. त्याने ७३ धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कारही मिळवला. याबद्दल फाफने त्याचेही कौतुक केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकात ५ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर बेंगलोरने १८.४ षटकात २ बाद १७० धावा करत सामना जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीच्या चाहत्यांना विराटकडून मोठ्ठ गिफ्ट! पण चाहत्यांनीही तब्बल दीड वर्षे वाट पाहिलीये
बटरल भाऊ सुसाट! गुजरात-बंगळुरू सामन्यानंतर ऑरेंज कॅपची शर्यत अधिक तीव्र, बघा यादी
मुंबई इंडियन्सनंतर इंग्लंड संघाला मोठा झटका, महत्वाचा गोलंदाज दीर्घ कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर