दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडावर आयसीसीने एका कसोटी सामन्याची बंदी घातली आहे. त्यामुळे आता त्याला शुक्रवारपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे.
रबाडाने पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात जो रुटला बाद केल्यानंतर चूकीच्या प्रकारे हावभाव केले होते. त्यामुळे आयसीसीने त्याला एक डिमिरिट पाँइंट आणि सामना शुल्काच्या 15 टक्के दंड अशी शिक्षा सुनावली होती.
तसेच त्याला हा डिमिरिट पाँइंट मिळाल्याने त्याच्या खात्यात 24 महिन्यांमध्ये 4 डेमिरिट पाॅइंट्सचा समावेश झाला आहे. त्याचमुळे त्याला बंदीला सामोरे जावे लागले आहे.
या बंदीबद्दल रबाडा म्हणाला, ‘हे असे ज्याची मी अपेक्षा केली नव्हती. बंदी ही योग्य आहे की अयोग्य यापेक्षाही माझ्यावर बंदी घातली आहे, हे वास्तव आहे.’
‘असे सातत्याने व्हायला नको कारण माझ्यामुळे संघाला आणि मला स्वत:ला मान खाली घालावी लागत आहे. त्याचमुळे वाईट वाटत आहे. पण यामुळे मला माझ्या खेळावर काम करण्यासाठी आणि काही वेळ विश्रांती घेण्यासाठी वेळ मिळणार आहे.’
याबरोबरच रबाडाने असाही विश्वास व्यक्त केला की त्याच्या शिवाय खेळतानाही दक्षिण आफ्रिका इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत बरोबरी साधण्यात यशस्वी होईल. सध्या पहिल्या तीन कसोटी सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे.
असा आहे आयसीसीचा डिमिरिट पॉइंट्सचा नियम –
आयसीसीच्या नियमानुसार जर एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांच्या कालावधीत 4 डिमिरिट पॉइंट्स मिळाले तर त्याचे रुपांतर सस्पेन्शन पॉइंटमध्ये(suspension points) होते आणि खेळाडूवर बंदी(Ban) घातली जाऊ शकते.
तसेच दोन सस्पेन्शन पॉइंट्स मिळाले तर त्या खेळाडूसाठी जो सामना पहिला येईल त्यानुसार 1 कसोटी किंवा 2 वनडे किंवा 2 टी20 सामन्यांसाठी बंदी घातली जाते.
टीम इंडियाला मोठा धक्का! हा मोठा खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यातील टी२० मालिकेतून बाहेर
वाचा👉https://t.co/MvmF8ujdSS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020
टीम इंडियाचा सलामीवीर वापरतोय पिंपरी चिंचडवडची गाडी
वाचा👉https://t.co/2vFN3YaQoA👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @klrahul11— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020