Loading...

भारताच्या या क्रिकेटपटूने डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या करण्याचा केला होता विचार

क्रिकेटविश्वात असे बरेच खेळाडू असतात जे आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीबद्दल काहीही न लपवता सर्व सांगतात. असेच आपल्याला मिळालेली लोकप्रियता आणि नंतर आलेल्या निराशेबद्दल (Depression) भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने (Praveen Kumar) सांगितले आहे.

“एक काळ असा होता जेव्हा मी स्वत:चा जीव घेण्याचा विचार केला होता. आत्महत्या करण्याच्या विचाराने मी बंदूक घेऊन हरिद्वार जाणाऱ्या हायवेवर निघालो. परंतु, कारमध्ये आपल्या मुलांचा फोटो पाहुन मी माझा विचार बदलला,” असे एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रवीणने सांगितले.

“मी भावनिक झालो आणि मला आठवले की, माझी लहान लहान मुले आहेत. मी असे करून त्यांना नरकात टाकू शकत नाही. यानंतर मी माझा निर्णय बदलला,” असेही प्रवीण यावेळी म्हणाला.

“भारतात डिप्रेशनची काही कन्सेप्ट कुठे असते? याविषयी कोणालाही माहिती नाही. मेरठमध्ये तर कधीच नाही. मी कोणाशीही चर्चा करू शकत नव्हतो. माझी नेहमी चिडचिड होत होती. मी माझ्या सल्लागाराला सांगितले की मला माझ्या विचारांवर नियंत्रण करता येत नाही,” असे प्रवीण यावेळी म्हणाला.

“मी चांगली गोलंदाजी करत होतो. इंग्लंडमध्ये सर्वांनी माझी प्रशंसा केली. मी कसोटीबद्दल विचार करू लागलो होतो. अचानक सर्व काही गेले. मला वाटले की सर्वांनी हा विचार केला आहे की मी निवृत्त झालो होतो,” असेही प्रवीण यावेळी म्हणाला.

Loading...

स्वत:बद्दल सांगताना प्रवीण म्हणाला की, “काही महिन्यांपूर्वी मला माझी भीती वाटत होती. वाईट काळात तुमच्यावर हाच परिणाम होत असतो. जर कोणी मी फोन केल्यानंतर उत्तर दिले नाही तर मला वाईट वाटत होते. मी स्वत:ला दुर्लक्षित करत होतो. असो चांगली गोष्ट आहे की वाईट काळ गेला आहे.”

प्रवीणने भारताकडून आतापर्यंत 6 कसोटी सामने, 68 वनडे सामने आणि 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

Loading...

You might also like
Loading...