टी-20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान संघात निवड न झाल्यामुळे मोहम्मद रिझवान (Mohmmed Rizwan) आधीच चर्चेत होता. आता विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच त्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आगामी पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 साठी मुल्तान सुल्तांस संघाने रिझवानला रिलीज केले आहे (बाहेरचा रस्ता दाखवला आहे). विशेष म्हणजे, रिझवान अनेक वर्षांपासून या संघाचे कर्णधारपद भूषवत होता.
रिझवानसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुल्तान सुल्तांसने यावेळी एकाही खेळाडूला रिटेन (कायम) केलेले नाही. याचा अर्थ असा की, हा संघ आता पूर्णपणे नवीन खेळाडू आणि नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या इतर दिग्गज खेळाडूंना त्यांच्या संघांनी ‘प्लॅटिनम’ श्रेणीत कायम ठेवले आहे.
बाबर आझम: पेशावर जल्मी
शाहीन शाह आफ्रिदी: लाहोर कलंदर्स
शादाब खान: इस्लामाबाद युनायटेड
अबरार अहमद: क्वेटा ग्लॅडिएटर्स
हसन अली: कराची किंग्स
पीएसएल 2025 चा अंतिम सामना क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यात झाला होता. क्वेटाने 20 षटकांत 201 धावा केल्या होत्या, पण लाहोर कलंदर्सने 19.5 षटकांत 204 धावा करून विजेतेपद पटकावले.
पीएसएल 2026: रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी
लाहोर कलंदर्स: शाहीन शाह आफ्रिदी (प्लॅटिनम), अब्दुल्ला शफीक, सिकंदर रझा, मोहम्मद नईम.
क्वेटा ग्लॅडिएटर्स: अबरार अहमद (प्लॅटिनम), उस्मान तारिक, हसन नवाज, शमिल हुसेन.
इस्लामाबाद युनायटेड: शादाब खान (प्लॅटिनम), सलमान इरशाद, अँड्रिज गॉस.
पेशावर जाल्मी: बाबर आझम (प्लॅटिनम), सुफयान मोकिम, अब्दुल समद, अली रझा.
कराची किंग्स: हसन अली (प्लॅटिनम), मोहम्मद अब्बास आफ्रिदी, खुशदिल शाह, साद बेग.
मुल्तान सुल्तांस: एकही खेळाडू कायम ठेवलेला नाही.






