पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज इमाम-उल-हक जखमी झाला आहे. राष्ट्रीय टी २० चषक २०२१ च्या सामन्यादरम्यान त्याच्या बरगडीला दुखापत झाली आहे. याच कारणामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता. नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पाकिस्तान संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे इमामचे हाड मोडलेले नाही आणि तो लवकर बरा होण्याची अपेक्षा आहे. इमाम सध्या राष्ट्रीय टी -२० चषकात बलुचिस्तान संघाचा कर्णधार आहे.
इमामचा संघ बलुचिस्तानचा सामना सदर्न पंजाबविरुद्ध होता. हा सामना रावळपिंडी येथे खेळला गेला. या सामन्यात पंजाबचा फलंदाज शोएब मकसूदचा एक फटका सीमारेषेकडे मारला. त्यावेळी चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात इमाम बाउंड्री लगतच्या बोर्डला धडकला. यामुळे त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली. इमाम जखमी होताच संघाचे फिजिओथेरपिस्ट मैदानावर पोहोचले. पण त्याला खूप वेदना होत होत्या. यानंतर इमामला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने यात त्याची बरगडी मोडली नाही.
दुखापतीमुळे इमाम बलुचिस्तानसाठी फलंदाजीसाठी मैदानावर आला नाही. मात्र, कर्णधाराच्या अनुपस्थितीतही संघाने चांगली कामगिरी केली आणि २ विकेट गमावून विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य गाठले. बलुचिस्तानच्या विजयात अब्दुल बंगालझाई आणि अब्दुल्ला शफीक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी केली.
बंगालझाईने त्याच्या ५० धावा ४२ चेंडूत पूर्ण केल्या. त्याच्या डावात या फलंदाजाने ७ चौकार लगावले. शफीकनेही २८ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. शफीक बाद झाल्यानंतर हरीस सोहेलने ३५ चेंडूत ४७ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
Imam Ul Haq out of field after getting injured, Hope he will be fine #NationalT20Cup pic.twitter.com/iWJzWIjqGQ
— Adnan Matloob (@AdnanMatloob5) October 1, 2021
राष्ट्रीय टी-२० चषकातील इमामची कामगिरी साधारण राहिली आहे. तो चार डावांमध्ये १०.२५ च्या सरासरीने फक्त ४१ धावा करू शकला आहे. त्यांचा संघ बलुचिस्तान सध्या गुणतालिकेत ४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघासोबत इमाम होता. तेथे त्याला ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. इमामने मालिकेच्या तिसऱ्या वनडेमध्ये ५६ धावा केल्या होत्या. इमाम पाकिस्तानसाठी ११ कसोटी, ४६ एकदिवसीय आणि २ टी -२० खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीनंतर ‘या’ खेळाडूकडे सोपवण्यात यावी भारताच्या कर्णधारपदाची धूरा, डेल स्टेनचे मत
आयपीएल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी सोडला सुटकेचा निश्वास; ‘या’ प्रमुख नियमात मिळाली सूट
खुर्रम मंजूरने वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची घेतली शाळा, एकाच षटकात ठोकले ५ चौकार