---Advertisement---

२७ वर्षांनंतर न्यूझीलंड-पाकिस्तानच्या या दोन खेळांडूबाबत घडला अनोखा योगायोग

On: बुधवार, जून 26, 2019 6:22 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। आज(26 जून) 2019 विश्वचषकात 33 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात एजबस्टर्न स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात 27 वर्षांनंतर न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम आणि पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हक बाबत एक खास योगायोग झाला आहे.

आज न्यूझीलंडच्या 11 जणांच्या संघात टॉम लॅथम तर पाकिस्तानच्या 11 जणांच्या संघात इमाम उल हक खेळत आहेत.

विशेष म्हणजे 18 मार्च 1992 ला न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यात टॉम लॅथमचे वडील रोडनी लॅथम हे न्यूझीलंडच्या 11 जणांच्या संघातून तर इमाम उल हकचे काका इंझमाम उल हक हे पाकिस्तानच्या 11 जणांच्या संघाकडून खेळत होते. तसेच त्यांचा हा कारकिर्दीतील पहिलाच विश्वचषक होता.

आता 27 वर्षांनंतर इंजमाम आणि रोडनी यांची पुढील पिढी एकमेकांविरुद्ध विश्वचषकात त्यांच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांच्याही कारकिर्दीतील हा पहिलाच विश्वचषक आहे.

आज सुरु असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांची सुरुवात खराब झाली आहे. 26.2 षटकात 83 धावांवर 5 विकेट्स गमावल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

गांगुलीपाठोपाठ भारताच्या या दिग्गज क्रिकेटपटूनेही दिला एमएस धोनीला पाठिंबा

भारताविरुद्धच्या सामन्यासाठी बांगलादेशची साथ देणार हा माजी भारतीय खेळाडू

भारताविरुद्धच्या सामन्याआधी बांगलादेशला बसला हा मोठा धक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment