बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हे स्पष्ट केले आहे की, जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौर्यावर कसोटी मालिकेसाठी तयारी करीत असेल तेव्हा, आणखी एक भारतीय संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. म्हणजे, एकाचवेळी दोन भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार आहेत. फक्त त्याचे स्वरूप वेगळे असेल. याचा अर्थ एका संघातील खेळाडू दुसर्या संघात भाग घेऊ शकणार नाहीत. हे जरासे विचित्र वाटते. मात्र, भारतीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे नवीन नाही नवीन नाही. एकाच देशाचे दोन भिन्न संघ एकाच वेळी आंतरराष्ट्रीय सामने खेळले असल्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.
तेव्हा भारताने पाठवले होते दोन संघ
भारताबद्दल बोलायचे झाले तर १९९८ मध्ये घडले होते. त्या वेळी प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केला गेलेला. तेव्हा प्रमुख भारतीय संघ सहारा कपमध्ये खेळत होता. अशा परिस्थितीत बीसीसीआयने आपले दोन संघ निवडले. मुख्य भारतीय संघ मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात सहारा कप खेळण्यासाठी गेला असताना, दुसऱ्या भारतीय संघाने अजय जडेजाच्या नेतृत्वात राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला. या संघात सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे होते तर, सौरव गांगुली अझरच्या संघाचा खेळाडू होता.
कोविडनंतर घडलेल्या घटना
गेल्या वर्षी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात कोविड दरम्यान पहिली क्रिकेट मालिका खेळली गेली होती. ही मालिका २८ जुलै रोजी समाप्त होणार होती. त्यानंतर दोनच दिवसांनी इंग्लंड आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार हे ठरलेले. त्यामुळे, इंग्लंडच्या कसोटी संघातील कोणताही खेळाडू वनडे संघात सामील होऊ शकला नाही. या कारणाने इंग्लंडला दोन संघ निवडावे लागले. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत खेळलेला एकही खेळाडू आयर्लंडविरुद्ध खेळला नाही.
अलीकडे ऑस्ट्रेलियाला त्यांचे दोन संघ निवडावे लागले निवडले होते. फेब्रुवारी-मार्चमध्ये ते न्यूझीलंडमध्ये टी२० मालिका आणि त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळणार होते. परंतु, कोविडमुळे कसोटी मालिका रद्द झाली आणि ऑस्ट्रेलियाला दोन संघ घ्यावे लागले नाहीत. २०१७ मध्ये देखील ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या टी२० मालिकेत वेगळा संघ खेळवला तर, भारतातील कसोटी मालिकेत वेगळा संघ पाठवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशीलमुळे कुस्ती क्षेत्राची नाचक्की, कुस्ती महासंघाची त्या घटनेवर मोठी प्रतिक्रिया
क्रिकेटविश्वात हळहळ! मैदानावर हृदयविकाराचा झटका येऊन युवा क्रिकेटपटूचे निधन