विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा भारतीय संघाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून समोर आला आहे. त्याने २०२२ मध्ये जेवढ्या सामन्यांमध्ये नेतृत्व केले, ते सर्व सामने भारताने जिंकले आहेत. पण कर्णधार रोहित ज्या सामन्यांमध्ये अनुपस्थित होता, त्या सामन्यांमध्ये भारताला पराभव मिळाला होता. आता रिषभ पंत याने हे सत्र रोखले आणि नियमित कर्णधार रोहितच्या अनुपस्थितीत संघाला वर्षातील पहिला विजय मिळवून दिला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या मालिकेत भारताचे नेतृत्व करत आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्ली, तर दुसरा सामना कटकमध्ये खेळला गेला. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघ पराभूत झाला होता. पण मंगळवारी (१४ जून) विशाखापटणममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पंतच्या नेतृत्वातील भारतीय संघ विजयी ठरला. पंत चालू वर्षात रोहितच्या अनुपस्थितीत भारताला विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार ठरला आहे.
चालू वर्ष जवळपास अर्धे लोटले आहे. यादरम्यान एकूण चार खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्व केले, पण त्यातीत फक्त एक कर्णधार यशस्वी ठरला आहे. या चार खेळाडूंची नावे म्हणजे, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि रिषभ पंत. रोहितच्या नेतृत्वात भारताने यावर्षी एकूण ११ सामने खेळले आणि त्यातील सर्वच्या सर्व ११ सामने जिंकले देखील.
First win as #TeamIndia 🇮🇳 Captain 👌👌
Well done, @RishabhPant17! 👏👏#INDvSA | @Paytm pic.twitter.com/3fhaXK24XX
— BCCI (@BCCI) June 14, 2022
विराट कोहलीने फक्त एका कसोटी सामन्यात यावर्षी संघाचे नेतृत्व केले, ज्यामध्ये भारत पराभूत झाला. केएल राहुलच्या नेतृत्वात भारताने चालू वर्षात एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने गमावले आहेत. रिषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात संघ पराभूत झाला, पण तिसऱ्या सामन्यात अखेर भारताने विजय मिळवला. याच पार्श्वभूमीवर पंत २०२२ मध्ये भारताला विजय मिळवून देणारा रोहित शर्मानंतरचा दुसरा कर्णधार ठरला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अरेरे! दुसऱ्या कसोटी विजयासह मालिकाही खिशात घातलेल्या इंग्लंडला आयसीसीकडून दंड, २ गुणही कापले
वयाच्या २३व्या वर्षी अर्धशतकवीर इशान किशनच्या नावे मोठी कामगिरी; रैना, रोहित आणि विराटशी बरोबरी
ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?