भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे पकड बनवली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळापासूनच ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर दबाव बनवलेला आहे. याचे पूर्ण श्रेय स्टीव स्मिथच्या फलंदाजीला जाते. स्मिथने पहिल्या डावात 131 धावांची शानदार शतकी खेळी केली व दुसऱ्या डावातही 81 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने खास विक्रम केला आहे.
याचबरोबर स्टीव स्मिथने बॉर्डर-गावसकर मालिकेत (भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका) सर्वाधिकवेळा सामन्याच्या दोन्ही डावात 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याची बॉर्डर-गावसकर मालिकेत सामन्यातील दोन्ही डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची तिसरी वेळ आहे.
या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर व रिकी पाँटिंग आहेत. सचिन व पाँटिंग यांनी प्रत्येकी 4 वेळा अशी कामगिरी केली आहे. स्मिथ सोबतच व्हीव्हीएस लक्ष्मण व ख्रिस रॉजर्स यांनी देखील प्रत्येकी 3 वेळा दोन्ही डावात 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
दरम्यान सामन्याचा विचार केला असता ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 338 धावांचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 6 बाद 312 धावांवर घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावातील 94 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने 407 धावांचे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीन(84), स्टिव्ह स्मिथ (81) आणि मार्नस लॅब्यूशाने (73) यांनी अर्धशतके झळकावली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर 2 बाद 98 धावा केल्या आहेत. अजूनही भारताला 309 धावांची आवश्यकता आहे. भारताकडून रोहित शर्मा 52 धावा करुन बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रिस्बेन कसोटी खेळण्यासाठी भारतीय संघ तयार, पण असेल ‘ही’ अट