---Advertisement---

फिफा विश्वचषकातही दिसली ‘स्त्रीशक्ती’, पुरुषांच्या सामन्यात महिलांनी घडवला इतिहास

On: शुक्रवार, डिसेंबर 2, 2022 12:24 PM
FIFA Women World Cup
---Advertisement---

सध्या कतारमध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक खेळवला जात आहे. या स्पर्धेत गुरुवारी (दि. 1 डिसेंबर) जर्मनी विरुद्ध कोस्टारिका हा सामना खेळवला गेला. या सामन्यात एक इतिहास घडला. तो म्हणजे सामन्यातील सर्व 4 रेफरी या महिला होत्या. त्याचबरोबर स्टेफनी फापार्ट या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रेफरी म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या आहेत. त्या मुळच्या फ्रांस या देशाच्या आहेत. त्याचबरोबर फ्रापार्ट यांच्या जोडीला सहाय्यक रेफरीच्या भुमिकेत देखील दोन महिला रेफरी होत्या. या सहाय्यक महिला रेफरींमध्ये ब्राझीलच्या नुएजा बॅक आणि मॅक्सिकोच्या कारेन डियाझ मेडिना यांचा समावेश होता. अशा प्रकारे मैदानावर अधिकाऱ्याच्या भुमिकेत तीनही महिलाच होत्या

गुरुवारी फिफा विश्वचषकाच्या जर्मनी विरुद्ध कोस्टारिका या सामन्यात रेफरी पदाची धुरा ही महिलांनी सांभाळली. फांसच्या स्टेफनी फ्रापार्ट (stephanie frappart) या फिफा विश्वचषकात रेफरी म्हणून काम बघणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्याचबरोबर अमेरिकेच्या कॅथरीन नेसबीट (katherine nesbitt) यांनीही अल-बायत स्टेडीयममध्ये ऑफसाईड विशेषज्ञाच्या भुमिकेत दिसल्या. रेफरी म्हणून काम बघणाऱ्या महिलांमध्ये दोन आणखी महिला होत्या. रवांडा देशाच्या सलीमा मुकानसांगा (Salima Mukansanga) आणि जपान देशाच्या योशिमी यामाशिता (Yoshimi Yamashita) या देखील फिफा विश्वचषकाच्या रेफरीच्या भुमिकेत असणाऱ्या महिलांच्या यादीत सामील आहे.

विश्वचषकाच्या 44व्या सामन्यात घडला इतिहास
फिफा विश्वचषकाच्या 44व्या सामन्यात ऐतिहासिक नियुक्त्या केल्या होत्या. स्टेफनी फ्रापार्ट यांनी याआधी देखील फिफा विश्वचषकात चौथ्या अधिकाऱ्याच्या रुपात काम केले आहे. फ्रांसच्या 38 वर्षीय फ्रापार्ट यांना युरोपियन फुटबॉल संस्था युएफाने पुरुषांच्या सामन्यात रेफरीची भुमिका निभावण्यासाठी पदोन्नती दिली आहे. फ्रापार्ट यांनी विश्वचषक पात्रता फेरी आणि चॅम्पियन्स लीग बरोबरच या वर्षीच्या फ्रेंच कपच्या अंतिम सामन्यात देखील रेफरीच्या भुमिकेत होत्या.(In FIFA World Cup history has made by Women refrees)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्पर्धा भारताची दबदबा विदेशी खेळाडूंचा! बेस प्राईजची रक्कम वाचून बसेल धक्का
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---