क्रिकेट जगतातील दोन कट्टर विरोधी संघांचा विचार केला तर सर्वांच्या डोळ्यासमोर दोन संघांची नावे येतात, एक भारत आणि दुसरा पाकिस्तान. या दोन देशांमध्ये अनेकदा रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमने सामने आले आहेत, तेव्हा प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन झाले आहे. यामध्ये अनेकदा मैदानावर खेळाडूंमध्ये झालेला वादही पाहायला मिळाला आहे. अजूनही जेव्हा पाकिस्तानविरुद्ध सामना असेल तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. असाचा एक किस्सा भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आलेले असताना सांगितला आहे.
कार्यक्रमात कपिल शर्माने या किस्स्याची आठवण करून दिली, जेव्हा भारत पाकिस्तान सामन्यात शोएब अख्तर गोलंदाजीसाठी रनअप घेत होते आणि तेव्हा बॅकफुटवर खेळण्याऐवजी मोहम्मद कैफने काही पाऊल पुढे जाऊन फलंदाजी केली होती. कैफने असे केल्यामुळे पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची लय बिघडली होती. कैफसोबत कार्यक्रमामध्ये सेहवागही सहभागी झाला होता.
कपिलने या किस्स्याची आठवण काढल्यानंतर मोहम्मद कैफने यावेळी काय घडले होते ते सांगितले आहे. त्याने सांगितली आहे की, मला त्याची थोडी बदनामी करायची होती. याव्यतिरिक्त कैफने सांगितले कशाप्रकारे त्याने त्याची बदनामी करण्यासाठी रणनीती तयार केली होती.
तो म्हणाला, “कारण तो सुप्रसिद्ध गोलंदाज होता, त्याचे रनअप खूप लांब होते. सेहवागने तर खूप षटकार मारले, मला खेळण्याची कमी संधी मिळाली. तो जेव्हा आला, मी देखील पुढे गेलो. त्याने गोलंदाजी केली नाही, थांबवली. मला माहित होते मी पुढे जाईल आणि तो गोलंदाजी करणार नाही. म्हणून हा माझा प्लॅन होता की, त्याची पाकिस्तामध्ये जरा बदनामी करतो आणि तो यशस्वी झाला.”
https://www.instagram.com/p/CUNSO-7BOX4/?utm_source=ig_web_button_share_sheet
याव्यतिरिक्त कार्यक्रमात कैफने कपिल शर्माची फिरकी घेतली आहे. तो म्हणाला की, “आम्ही एकमेकांनी हा कार्यक्रम हिट होण्याच्या आधीपासून ओळखतो, पण तरीदेखील त्याने मला कधी क्रार्यक्रमात पाहुणा बनवले नाही.” यावर सेहवाग म्हटला की, “चुकीच्या माणसाबरोबर पंगा घेतला.”
महत्वाच्या बातम्या-
Video: केवळ १८ धावांची खेळी केली, पण साहाने त्याच्या ८३ मीटरच्या षटकाराने मिळवली सर्वांची वाहवा
सनरायझर्सच्या विजयाचा नायक ठरलेल्या रॉयची सामनावीर ठरल्यानंतर भावुक प्रतिक्रिया, म्हणाला…
सनरायझर्सने तोडले वॉर्नरसोबतचे नाते! स्वतः दिली माहिती, उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता धूसर