टी-२० विश्वचषकाचा ३९ वा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शारजाह येथे खेळला गेला. इंग्लड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेने आपल्या जबरदस्त गोलंदाजी आक्रमणाने इंग्लड संघाला निर्धारित २० षटकात १७९ धावांवर रोखले आणि सामना १० धावांनी जिंकला. या सामन्यात कागिसो रबाडाने हॅट्रिक घेत टी२० विश्वचषकात विक्रमी कामगिरी केली आहे.
इंग्लड संघाला २० व्या षटकात १४ धावांची गरज होती. कागिसो रबाडाने पहिल्याच चेंडूवर ख्रिस वोक्सला ७ धावांवर बाद केले. दुसऱ्या चेंडूवर कर्णधार ओएन मॉर्गन (१७) बाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवर ख्रिस जॉर्डन बाद झाला. यासह रबाडाची हॅट्ट्रिकही पूर्ण झाली. त्याने या षटकात केवळ ३ धावा दिल्या. या टी-२० विश्वचषकातील ही तिसरी हॅट्रिक आहे. याआधी श्रीलंकेचा वाणिंदु हसरंगा आणि आयर्लंडचा कर्टिस कॅम्पर यांनी हॅट्रिक नोंदवल्या होत्या.
तसेच दक्षिण आफ्रिकेकडून टी२० मध्ये हॅट्रिक घेणारा रबाडा पहिला गोलंदाज ठरला आहे. याशिवाय टी-२० मध्ये इंग्लडविरुद्ध हॅट्रिक घेणाराही रबाडा पहिला गोलंदाज ठरला आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांमध्येही रबाडाने स्थान मिळवले आहे. याआधी ऑस्ट्रेलिया संघाचा ब्रेट ली, श्रीलंका संघाचे लसीथ मलिंगा, थिसारा परेरा, वाणींदु हसरंगा यांनी अशी कामगिरी केली होती.
तत्पूर्वी, इंग्लड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिका संघाने निर्धारित २० षटकांत २ गडी गमावून १८९ धावा केल्या. रासी व्हॅन डर डुसेन नाबाद ९४ धावांचे योगदान दिले होते. त्याने आपल्या खेळी दरम्यान त्याने सहा षटकार आणि पाच चौकार लगावले. तर एडन मार्करामने ५२ धावा केल्या. दोन्ही खेळाडूंनी तिसऱ्या गड्यासाठी ५२ चेंडूत १०३ धावांची भागीदारी केली. क्विंटन डी कॉकनेही २७ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि मोईन अलीने प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ३७ धावा केल्या होत्या. तर डेविड मलानने ३३ धावा जोडल्या होत्या. परंतु इतर फलंदाजाना मोठी खेळी करता आल्या नाहीत. परिणामी दक्षिण आफ्रिकेने सामना खिशात घातला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराटसेने’ला मिळाली उपांत्य फेरीत पोहोचण्याची किल्ली! अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज दुखापतीतून सावरला