---Advertisement---

भारतीय पठ्ठ्याचा अमेरिकेत दणका! उन्मुक्त चंदने अवघ्या ५२ चेंडूत ठोकले शतक, गगनचुंबी षटकारांचा पाडला पाऊस

On: सोमवार, सप्टेंबर 27, 2021 10:19 PM
---Advertisement---

उन्मुक्त चंदने मायनर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सगळ्यांना चकित केले आहेत. ऑस्टिन ऍथलेटिक्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्सकडून खेळताना ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. यादरम्यानचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

मायनर क्रिकेट लीगने उन्मुक्त चंदचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याच्या १३२ धावांच्या खेळीत उन्मुक्तने १५ चौकार आणि ७ षटकार मारले आहेत. उन्मुक्तच्या खेळीच्या जोरावर ऑस्टिनचा संघ २० षटकांत ९ गडी बाद १८४ धावा करू शकला आहे. उन्मुक्तने केवळ ५२ चेंडूत आपले शतक केले, ज्यामध्ये त्याने ६ षटकार ठोकले, पण सिलिकॉन व्हॅलीचा संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी झाला आणि त्यांनी १९.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले.

https://twitter.com/usacricket/status/1442225335601295361?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442225335601295361%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Fin-usa-minor-league-cricket-unmukt-chand-hit-the-bowlers-fiercely-scored-7-sixes-and-15-fours-made-a-stormy-century-watch-video-2555259

उन्मुक्त चंदने त्याच्या डावादरम्यान ७ षटकार मारले आणि त्याने मारलेले षटकार गगनचुंबी होते. आपल्या १३२ धावांच्या डावात उन्मुक्तने फक्त चौकार आणि षटकारांसह १०२ धावा फटकावल्या. मायनर लीग क्रिकेट आता शेवटच्या टप्प्यात आहे. उन्मुक्त चंदचा संघ शेवटच्या फेरीत चौथ्या स्थानावर राहिला आहे.

https://twitter.com/MiLCricket/status/1442260874408783873?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1442260874408783873%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Fin-usa-minor-league-cricket-unmukt-chand-hit-the-bowlers-fiercely-scored-7-sixes-and-15-fours-made-a-stormy-century-watch-video-2555259

भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदने अमेरिकेत मायनर लीग क्रिकेटच्या २०२१ हंगामासाठी सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्ससोबत करार केला होता. या स्पर्धेत आत्तापर्यंत २०० पेक्षा जास्त सामने खेळले गेले आणि एकूण ४०० पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत. अमेरिकास्थित विविध २६ ठिकाणांवर ही स्पर्धा खेळवण्यात येते.

असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी मागील काही काळात आपल्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली आहे आणि अमेरिकेकडून खेळण्यासाठी वळले आहेत. भारतात क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवणे आणि भारतीय संघाकडून खेळणे हे मोठे जिकरीचे काम होऊन बसल्याने, भारतातूनही काही खेळाडू अमेरिकेत जाऊन कारकीर्द घडवण्याचा विचार करत होते. यात भारतीय क्रिकेटपटू उन्मुक्त चंदसह, सनी सोहेल, स्मित पटेल, सिद्धार्थ त्रिवेदी आदी क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अमेरिकेच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या-
-‘या’ खेळाडूची लागली ‘लॉटरी’, टी-२० विश्वचषकात घेणार हार्दिक पंड्याची जागा?
-मुंबई इंडियन्सचे ग्रह फिरले, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुणतालिकेत ‘मोठा’ धक्का
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---