भारतीय क्रिकेटमधील गब्बरसिंग अशी ओळख असणाऱ्या शिखर धवनने काल श्रीलंकेविरुद्ध तडाखेबंद खेळी करताना ९० चेंडूत १३२ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील आपला जबदस्त फॉर्म वनडेमध्येही कायम राखत धवनने काल विक्रमांची अनेक शिखरे गाठली.
असाच या विक्रमाच्या शिखरांचा महा स्पोर्ट्सच्या आकडेवारी टीमने घेतलेला महा आढावा:
#१ लंकेविरुद्ध शिखर धवनच्या शेवटच्या सहा वनडे खेळी: ९४, ११३, ७९, ९१, १२५, १३२*
#२ लंकेविरुद्ध सर्वात वेगवान दुसऱ्या क्रमांकाचं शतक आता शिखरच्या नावावर. सेहवाग(६६चेंडूत), धवन(७१ चेंडूत), सेहवाग(७५ चेंडूत )
#३ धवनची ही वैयक्तिक सर्वात वेगवान शतकी खेळी. यापूर्वी २०१३ साली विंडीज विरुद्ध कानपुर या ठिकाणी ७३ चेंडूत शतक
#४ धवनचे ही ११ वनडे शतक, ८वे परदेशी भूमीवरील, ६वे धावांचा पाठलाग करताना, ४थे डे-नाइट सामन्यातील केलेले शतक, लंकेविरुद्ध ३रे, लंकेतील पहिले, आशियातील ४थे तर २०१७मधील दुसरे वनडे शतक आहे.
#५ ११ वनडे शतके खेळण्यासाठी कमी डाव घेणाऱ्या खेळाडूंमध्ये वॉर्नरसह चौथ्या स्थानी
#६ लंकेत सर्वात वेगवान दुसऱ्या क्रमांकाचं शतक आता शिखरच्या नावावर. सेहवाग(६९चेंडूत), धवन(७१ चेंडूत)
#७ धवनने गेल्या ६ वनडेमध्ये एकदाही ७९ पेक्षा कमी धावांची खेळी केली नाही. त्यात ३ वेळा त्याने शतकी खेळी केली आहे.