---Advertisement---

भारत वि. ऑस्ट्रेलिया । जडेजा-आश्विनच्या फिरकीची कमाल, 177 धावांत आटोपला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

Ravindra Jadeja
---Advertisement---

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात जबरदस्त केली. उभय संघांतील बॉर्डर गावसकर ट्रॉफी गुरुवारी (9 फेब्रुवारी) नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सुरू झाली. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आला. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली, पण यजमानांनी ऑस्ट्रेलियाला स्वस्तात गुंडाळले.

ऑस्ट्रेलियन संघ कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 63.5 षटके खेळला आणि 177 धावा करून सर्वबाद झाला. यात स्टीव स्मिथ (Steve Smith ) आणि मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) यांनी अनुक्रमे 37 आणि 49 धावांची खेळी केली. अष्टपैलू रविंद्र जडेजा मोठ्या काळानंतर भारतीय संघात पुनरागमन करत असून त्याने पहिल्या डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जडेजाने टाकलेल्या 22 षटकांमध्ये 47 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. खेळपट्टीवर सेट झालेल्या स्मिथ आणि लाबुशेन यांनाही जडेजानेतच तंबूचा रस्तात दाखवला. त्याव्यतिरिक्त फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यानेही तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या पहिल्या कसोटीसाठी सूर्यकुमार यादव आणि केएस भरत यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले. केएल भरतने यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मार्नस लाबुशे फलंदाजी करत असताना अचूक स्टंपिंग केली आणि ऑस्ट्रिलियाची महत्वाची विकेट घेतली. तर सूर्यकुमार चांगल्या फलंदाजीची अपेक्षा चाहत्यांना आहे. अश्विन, जडेजा व्यतिरिक्त भारतासाठी या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनीही महत्वाच्या विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी प्रत्येकी खेळाडू एक एक धाव करून शमी आणि सिराजच्या गोलंदाजीवर विकेट गमावली.  (In the first innings of the first Test, the Australian team was bowled out for 177 runs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानचं काही खरं नाही! भारतीय महिला फलंदाजाने 56 चेंडूत चोपल्या 91 धावा, षटकारांचाही पाडला पाऊस
एकीकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात काँटे की टक्कर, दुसरीकडे धोनी ट्रॅक्टरने नांगरतोय शेती, व्हिडिओ तुफान व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---