पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे इंदोरच्या होळकर स्टेडियवर देखील परिस्थिती फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल पाहायला मिळाली. परिणामी बुधवारी (1 मार्च) सुरू झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ स्वस्तात गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियन संघा देखील दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. पण पाहुण्या संघाने भारतावर 88 धावांची आघाडी घेतली.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत होता. डावाची सुरुवात 4 बाद 156 धावांवर झाली. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलिया संघ 197 धावांवर असताना भारतीय संघाने त्यांची शेवटची विकेट घेतली. सलामीवीर उस्मान ख्वाजा याने ऑस्ट्रेलियन संघासाठी या डावात सर्वाधिक 60 धावा केल्या. भारतासाठी फिरकीपटू रविंद्र जडेजा पुन्हा एकदा चमकदाल. जडेजाने 4 तर रविचंद्रन अश्विनन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स नावावर केल्या.
तत्पूर्वी बुधवारी उभय संघांतील हा तिसरा कसोटी सामना सुरू झाली. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला दारून पराभव स्वीकारावा लागला होता. असात तिसऱ्या कसोटीत देखील भारतीय संघ चांगली सुरुवात करेल अशी अपेक्षा होती. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण फलंदाज संघाला चांगली सुरुवात देऊ सकले नाहीत. सलामीवीरांसह संपूर्ण फलंदाजी क्रम एकापाठोपाट विकेट्स गमावताना दिसला. परिणामी इंदोर कसोटीच्या पहिल्या डावात भारताने अवघ्या 109 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या.
ऑस्ट्रेलिया संघ ही बॉर्डर गावसकर कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीपासून भारतीय खेळपट्टीविषयी बोलत आला आहे. भारतीय खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल राहिली आहे. यावर्षीच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत देखील असेच पाहायला मिळाली. परिणामी ऑस्ट्रेलियाचे या मालिकेतील प्रदर्शन खूपच निराशाजनक पाहायला मिळाले. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियान एक डाव आणि 132 धावांनी पराभव स्वीकारला, तर दुसऱ्या डावात 6 विकेट्सच्या अंतराने पाहुणा संघ पराभूत झाला. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात मिळाली, पण फलंदाजी करताना खेळाडूंनी पुन्हा एकदा स्वस्तात विकेट्स गमावल्या. अशात तिसरा सामना जिंकणेही ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसेल.
(In the first innings of the Indore Test, the Australian team was all out within 200 runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“असे काही होण्याची अपेक्षाच नव्हती”, भारतीय फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीवर प्रशिक्षकांची तीव्र नाराजी
बीसीसीआयचा स्वागतार्ह निर्णय! WPL मध्ये मुली-महिलांना मोफत प्रवेश, पुरूषांसाठी तिकिटाचे नाममात्र दर