भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Of Sri Lanka) आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिक खेळत आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. भारत विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना कोलंबो मैदानावर खेळला गेला. हा सामना बरोबरीत सुटला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला. परंतू कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) दोन्ही सामन्यांमध्ये चमकदार फलंदाजी केली.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मानं (Rohit Sharma) 47 चेंडूत 58 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर रोहित शर्मानं (Rohit Sharma) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 44 चेंडूत 64 धावांची उत्कृष्ट खेळी केली. 64 धावांच्या खेळीत त्यानं 5 चौकारांसह 4 षटकार ठोकले.
शेवटच्या 3 वर्षात रोहित शर्माची आकडेवारीवरी शानदार राहिली आहे. रोहितनं विस्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन सादर केलं आहे. त्यानं 2022 मध्ये 41.50च्या सरासरीनं आणि 114.22च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. यानंतर, 2023 मध्ये, रोहितनं 52.29च्या सरासरीनं आणि 117.07च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. तर या वर्षी आतापर्यंत रोहित शर्मा (Rohit Sharma) 61च्या सरासरीनं आणि 134.06च्या स्ट्राइक रेटनं धावा करत आहे. गेल्या एकदिवसीय विश्वचषकात देखील रोहितन चमकदार कामगिरी केली.
रोहित शर्माच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूनं 264 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या फॉरमॅटमध्ये त्यानं 92.3च्या स्ट्राईक रेटनं आणि 49.23च्या सरासरीनं 10,831 धावा आहेत. याशिवाय त्यानं 31 शतकं झळकावली आहेत. तर 57 अर्धशतक ठोकले आहेत. तसंच, एकदिवसीय फॉरमॅटमध्ये 3 वेळा द्विशतक ठोकणारा रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सराव सत्रात रियानच्या हातात दिसली बॅट, तिसऱ्या वनडेत प्लेइंग इलेव्हनमध्ये होऊ शकतो मोठा बदल
अविश्वसनीय..! 67 वर्षापासून ‘या’ फिरकी गोलंदाजाचे रेकाॅर्ड कायम
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारताच्या वनडे संघातून ‘या’ 3 खेळाडूंची होऊ शकते कायमची सुट्टी!