चिपळूण येथे झालेल्या ६७ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात यजमान रत्नागिरी संघाने विजेतेपद पटकावले. तर महिला गटात पुणे संघाचा दबदबा राहिला.
महिला गटात झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यांत पुणे २२-२० सरस ठरला. मुंबई शहरने चांगला प्रतिकार केला मात्र त्याना विजेतेपद पटकावता नाही आले. पुणे कडून अंकिता जगताप, पूजा शेलार, मानसी सावंत यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर मुंबई कडून पूजा यादव, मेघा कदम, पौर्णिमा जेधे व तेजस्विनी पोटे यांनी चांगला खेळ दाखवला.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात यजमान रत्नागिरी संघाने मुंबई शहर विरुद्ध ३१-२८ असा विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. रत्नागिरी अजिंक्य होण्यात अजिंक्य पवार यांची भूमिका मोलाची ठरली. रत्नागिरी संघाने १९-०९ अशी मध्यंतरापर्यत आघाडी घेत सामन्यावर पकड मिळवली होती. पण मुंबई शहरने रत्नागिरी वर लोन टाकत सामन्यांत चुरस वाढवली होतो. मात्र विजय मिळवता आला नाही.
रत्नागिरी संघाकडून एक उत्कृष्ट सांघिक खेळाचा नमुना बघायला मिळाला. दोन्हीं अजिंक्य पवार, अदित्य-शुभम शिंदे बंधू, अभिषेक भोजणे, स्वप्नील शिंदे, शेखर तटकरे यांनी उत्कृष्ट खेळ करत रत्नागिरी संघाला आपल्या भूमीत विजेतेपद पटकावून दिले.
रत्नागिरी संघाने वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. तर पुणे महिला संघाने २२ वे विजेतेपद पटाकवले, तर गेल्या १३ वर्षांत १२ विजेतेपद पटाकवले आहेत.
संक्षिप्त निकाल:
महिला
विजेतेपद- पुणे जिल्हा
उपविजेतेपद- मुंबई शहर
तिसरा क्रमांक- मुंबई उपनगर
चौथा क्रमांक- ठाणे जिल्हा
पुरुष विभाग
विजेतेपद- रत्नागिरी
उपविजेतेपद- मुंबई शहर
तिसरा क्रमांक- रायगड
चौथा क्रमांक- सांगली
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत असे होणार उपांत्य फेरीचे सामने
वाचा👉https://t.co/mNryhpbnXQ👈#म #मराठी #Kabaddi @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019
आयपीएलच्या एकाही संघाने पसंती न दाखवलेल्या शाय होपने केला मोठा पराक्रम
वाचा- 👉https://t.co/b7hhGPLAx2👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #INDvWI #Hope— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019